Sambhajinagar News : पडेगाव कचरा डेपोतील धूर, दुर्गंधीवर महापौरांचा ॲक्शन प्लॅन file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : पडेगाव कचरा डेपोतील धूर, दुर्गंधीवर महापौरांचा ॲक्शन प्लॅन

दोन शिफ्टमध्ये कचरा प्रक्रिया : जुन्या कचऱ्यावर तातडीने बायोमायनिंगचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Mayor's Action Plan to Tackle Smoke and Foul Odor at Padegaon Garbage Depot

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्र परिसरात वाढलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची महापौर समीर राजुरकर यांनी गांभीयनि दखल घेत बुधवारी (दि.२०) प्रशासनाला तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. प्रक्रिया केंद्राची कार्यक्षमता वाढवून ते दोन शिफ्टमध्ये सुरू ठेवावे. तसेच जुन्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया त्वरित सुरू करावी, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

गेल्या आठवडाभरापासून कचऱ्याच्या साठ्याला आग लागली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. मागील अनेक दिवसांपासून अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासन आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र धुरामुळे पडेगाव आणि आसपासच्या भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी बुधवारच्या सर्वसाधारण सभेत करुणा जाधव, गणेश लोखंडे, रशीद मामू यांनी प्रश्न उपस्थित केला.

मात्र आचारसंहितेमुळे सर्वसाधारण सभेत चर्चा करता येणार नसल्याचे स्पष्ट करत महापौरांनी दालनात बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, घन कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांची उपस्थिती होती. बैठकीतनंतर महापौरांनी सांगितले की, पडेगाव कचरा डेपोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कचरा येतो, त्यावर प्रक्रिया न होता कचऱ्याचे ढीग तयार होत आहेत.

त्यासोबतच प्रक्रिया होऊ न शकलेल्या कचऱ्याला दरवर्षी उन्हाळ्यात आग लागत आहे. त्यावर तातडीने उपाय-योजना करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. यावर महापौर राजुरकर यांनी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होत असल्याचे नमूद करत साचलेला कचरा तातडीने कमी करण्यावर भर दिला.

वाढत्या कचऱ्याच्या प्रमाणामुळे प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढविणे अत्यावश्यक आहे. तसेच वैज्ञानिक पद्धतीने जुन्या कचऱ्याची विल्-हेवाट लावणे आणि प्रक्रिया केंद्राचे कामकाज अधिक गतीने चालविण्याचे आदेश महापौर राजुरकर यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT