छत्रपती संभाजीनगर

विकास उद्दिष्टपूर्तीसाठी मटेरियल सायन्स महत्त्वाचे - डॉ. अशोक महाजन

पदार्थविज्ञान विभागाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा थाटात समारोप

पुढारी वृत्तसेवा

Material science is crucial for achieving development goals - Dr. Ashok Mahajan

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेली शाश्वत विकास उद्दिष्टपूर्ती ही सन २०३० मध्ये पूर्ण करावयाची आहे. यासाठी मटेरियल सायन्स या क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास स्वारातीर्थ विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाच्या वतीने इनोव्हेशन इन मटेरियल्स सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर या विषयावरील परिषदेचा समारोप गुरुवारी (दि.५) सायंकाळी झाला. ही परिषद विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र सिरसाठ यांच्या गौरवार्थ ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली. पदार्थविज्ञान क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमान यांसह अनेक बदल होत आहेत.

परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रकुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी मार्गदर्शन केले. डॉ. महेंद्र शिरसाठ यांनी संशोधक म्हणून उत्तम कार्य केले याच्या आदर्श तरुण संशोधकांनी घ्यावात, असे अवाहनही डॉ. महाजन यांनी केले.

डॉ. वाल्मिक सरवदे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कुलसचिव डॉ. अमृतकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रा.एस.एस. हुसेनी व डॉ. रूपाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. माधव रोडे यांनी पाहुण्यांचा परिचय तर डॉ. प्रभाकर उंदरे यांनी आभार मानले. परिषदेत देशविदेशातील ४६४ शोधनिबंध सादर झाले. या परिषदेसाठी विभागातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांसह कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT