उद्योग महाकुंभसाठी अहोरात्र झटतायेत १,४०० हात File Photo
छत्रपती संभाजीनगर

उद्योग महाकुंभसाठी अहोरात्र झटतायेत १,४०० हात

मसिआचा महा एक्सपो, ८ जानेवारीमध्ये ऑरिक सिटीत भव्य आयोजन

पुढारी वृत्तसेवा

MASIA's Mega Expo will be grandly organized in Auric City on January 8th.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

ऑरिक सिटी शेंद्रा येथे ८ जानेवारीपासून होणाऱ्या उद्योजकांच्या महाकुंभ ( एक्सपो) ची मसिआकडून जोरदार तयारी सुरू आहे. एक्सपोसाठी ऑरिकने ५७.५ एकर जागा उपलब्ध करुन दिली असून, या जागेच्या अगदी लेव्हलिंगपासून ते भव्य आठ मोठे हॉल उभारणीसाठी मसिआ अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांच्यासह ६० पदाधिकारी आणि सुमारे ६०० पेक्षा जास्त कारागिर मागील दोन महिन्यांपासून अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या (मसिआ) वतीने दर ३ वर्षांनी ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचे आयोजन केले जाते. यंदा ८ ते ११ जा-नेवारी या कालावधीत ऑरिक सिटी शेंद्रा ऑरिक सिटी येथे ८ जानेवारीपासून होणाऱ्या उद्योग प्रदर्शनाची मसिआ पदाधिकारी, सभासद यांच्याकडून जय्यत तयारी सुरू आहे.

येथे ८ मोठ्या आकाराचे डोम तसेच पॅगोडामध्ये देशविदेशातील उद्योजकांचे तब्बल १५०० स्टॉल्स राहणार आहेत. २०२३ मधील एक्स्पोमध्ये ही संख्या ६५० होती. यावेळी ही संख्या दुप्पटीने अधिक असून, एक्सपोत राज्यासह देशातील मोठे उद्योग आणि काही आंतरर ाष्ट्रीय उद्योगांचाही सहभाग राहणार आहे.

या उद्योगांना पार्किंगसह आवश्यक इतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अध्यक्ष गायकवाड, संयोजक अनिल पाटील, चेतन राऊत तसेच राहुल मोगले, मनीष अग्रवाल, सचिन गायके, राजेंद्र चौधरी आणि इन्फ्रा हेड सुरेश खिल्लारे यांच्यासह मसिआ पदाधिकारी, सभासद परिश्रम घेत आहेत.

दिल्लीसह राज्यभर शिष्टमंडळाचे दौरे

या एक्सपोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, यासाठी मसिआ पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत. यासर्वांना तसेच राज्यभरातील उद्योजक, प्रतिष्ठीत व्यक्तींना एक्सपोचे आमंत्रण देण्यासाठी मसिआ पदाधिकाऱ्यांचे वेगवे-गळे शिष्टमंडळ हे दिल्ली, मुंबईसह नागपूर, सांगली, कोल्हापूर आणि विविध जिल्ह्याचे दौरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT