महाशिवरात्रीनिमित्त गौरक्षणासाठी मोर्चा file photo
छत्रपती संभाजीनगर

महाशिवरात्रीनिमित्त गौरक्षणासाठी मोर्चा

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज व गौरक्षक बांधवांच्या वतीने रविवारी (दि.१५) शहरात गौरक्षणाच्या समर्थनार्थ शांततापूर्ण व शिस्तबद्ध मोर्चा काढण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

March for cow protection on the occasion of Mahashivratri

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज व गौरक्षक बांधवांच्या वतीने रविवारी (दि.१५) शहरात गौरक्षणाच्या समर्थनार्थ शांततापूर्ण व शिस्तबद्ध मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने गौरक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि धर्माभिमानी नागरिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर सर्व कार्यकर्ते खंडकेश्वर महादेव मंदिर येथे एकत्र जमले. येथे भगवान शंकरांची सामूहिक महाआरती करण्यात आली.

यावेळी संजय बारगजे, राजेश जैन, जिल्हाप्रमुख गणेश शेळके, जिल्हा मंत्री अभिषेक कादी, सुनील चवरे, काशिनाथ डापके आदींसह सुमारे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच विश्व हिंदू परिषद विशेष संपर्क विभाग, देवगिरी प्रांताचे डॉ. जीवन राजपूत यांनी गौरक्षण हा भारतीय संस्कृती, श्रद्धा व ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित महत्त्वाचा विषय असल्याचे सांगून समाज आणि प्रशासनाने समन्वयातून ठोस पावले उचलावीत, असे आवाहन केले.

मकोका कायद्यांतर्गत कारवाई करा

प्रतिनिधी मंडळाने पोलिस आयुक्तालय येथे जाऊन अवैध गौतस्करी, गौवंश हत्या आणि संबंधित गुन्हेगारी साखळीवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी निवेदन- ाव्दारे केली. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT