Maratha organizations raise slogans in the hotel where Sharad Pawar stayed
शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा संघटनांची घोषणाबाजी Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा संघटनांची घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा

शरद पवार थांबलेल्या हॉटेल रूमच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आल्‍याचा प्रकार समोर आला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाही यावेळी करण्यात आली.

यावेळी मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्‍याचे पाहायला मिळाले. हॉटेलमध्ये मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मराठा कार्यकर्त्यांना चर्चेसाठी बोलावून घेतल्‍याची माहिती मिळत आहे.

SCROLL FOR NEXT