Maratha Kranti Morcha adopts an aggressive stance for permanent reservation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शाश्वत आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि. ९) आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांची परवानगी नसतानाही क्रांती चौकात उपोषण सुरू करण्यात आल्याने परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांचा विरोध असतानाही आंदोलकांनी सकाळी उपोषणाला सुरुवात केली. दुपारी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर ज्येष्ठ आरक्षण अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्तालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. शाश्वत आरक्षण मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त करत आंदोलनाची धग कायम ठेवली.
यावेळी मराठा समाजाला कायदेशीर, घटनात्मक आणि न्यायालयीन कसोटीवर टिकणारे शाश्वत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हे उपोषण आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, सकाळी दहा वाजेपासूनच क्रांती चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सव्वाअकराच्या सुमारास राजेंद्र दाते पाटील, प्रा. माणिकराव शिंदे, डॉ. शिवानंद भानुसे, योगेश शेळके धामोरीकर, सुनील कोटकर, अमित जाधव यांच्यासह आंदोलक क्रांती चौकात दाखल झाले. त्यानंतर राजेंद्र दाते पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली.
यावेळी मराठा समाजाला कायदेशीर, घटनात्मक आणि न्यायालयीन कसोटीवर टिकणारे शाश्वत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हे उपोषण आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, सकाळी दहा वाजेपासूनच क्रांती चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सव्वाअकराच्या सुमारास राजेंद्र दाते पाटील, प्रा. माणिकराव शिंदे, डॉ. शिवानंद भानुसे, योगेश शेळके धामोरीकर, सुनील कोटकर, अमित जाधव यांच्यासह आंदोलक क्रांती चौकात दाखल झाले. त्यानंतर राजेंद्र दाते पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली.
दरम्यान, क्रांती चौकात जमावबंदी असल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलन थांबविण्याची विनंती केली, मात्र आंदोलकांनी उपोषण सुरूच ठेवले. आम्हाला क्रांती चौकात उपोषण करू दिले जात नाही; दुसरीकडे एका समाजाला मोठ्या कार्यक्रमासाठी परवानगी दिली जाते. हा विरोधाभास का? असा सवाल आंदोलकांनी केला.
अखेर दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी उपोषणकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना दुपारी चार वाजेपर्यंत क्रांती चौकात ठेवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी क्रांती चौकात गेल्या वर्षभरापासून कोणालाही उपोषणाची परवानगी देण्यात येत नसल्याचे सांगत विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी आयुक्तालयासमोर उपोषण सुरू केले.
गॅझेटिअरबाबत भूमिका स्पष्ट करा हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे मराठा-कुणबी नोंद अथवा वंशावळ नसलेल्या मराठा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. एसईबीसी प्रवर्गाला ओबीसीप्रमाणे शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती, शुल्क सवलत व शासकीय योजनांचा लाभ द्यावा, आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घ्यावेत, सारथी संस्थेला पाच हजार कोटी, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दहा हजार कोटींचा निधी द्यावा, प्रलंबित उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात आणि कायगाव येथे मराठा हुतात्मा स्मारक उभारावे, या मागण्याही करण्यात आल्या.
जरांगेंना विरोध नाही
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना आपला विरोध नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. आमचा लढा केवळ शाश्वत आरक्षणासाठी सरकारविरोधात आहे. सरकारने मागण्या मान्य केल्यास जरांगे यांना २९ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याची वेळ येणार नाही. त्यांनी आंदोलन केलेच तर त्याला आमचा पाठिंबा असेल, असेही आंदोलकांनी सांगितले.
शाश्वत आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
परवानगी दिली जाते. हा विरोधाभास का? असा सवाल आंदोलकांनी केला. अखेर दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी उपोषणकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना दुपारी चार वाजेपर्यंत क्रांती चौकात ठेवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी क्रांती चौकात गेल्या वर्षभरापासून कोणालाही उपोषणाची परवानगी देण्यात येत नसल्याचे सांगत विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी आयुक्तालयासमोर उपोषण सुरू केले.