Numberless Vehicles : विनाक्रमांक वाहनचालकांची मुजोरी वाढली  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Numberless Vehicles : विनाक्रमांक वाहनचालकांची मुजोरी वाढली

वाहतूक पोलिस, आरटीओलाही जुमानेनात; प्रादेशिक अधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Many numberless vehicles are running recklessly in the city.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नवीन वाहन पासिंग झाल्याशिवाय ते वाहनधारकांच्या हाती द्यायचे नाही, असा दंडक असतानाही शहरात अनेक विनाक्रमांकाची वाहने बेदरकरापणे धावत आहेत. वाहतूक पोलिस फोटो काढून ऑनलाईन चालन पाठवत आहेत. वाहनांवर क्रमांकच नसल्याने ते सरळ पोलसांना कितीही फोटो काढा आमचे काहीच होणार नाही अशी मुजोरी भाषा करत निघून जात आहेत. हे वाहनधारक वाहतूक पोलिस आणि आरटीओ अधिकार्यांनाही जुमानत नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

नवीन वाहनांना नंबर प्लेट बसवल्याशिवाय ते वाहनधारकांच्या हाती देऊ नये अन्यथा त्यांच्यावर आरटीओ कार्यलायाच्या वतीने वाहन विक्रेता आणि त्या वाहनधारकांवर कारवाई होते. असा नियम असूनही आजघडीला अनेक विनाक्रमांकाची वाहने शरहात धावत आहेत. वाहनांवर क्रमांकच नसल्याने वाहतूक पोलिसांना कारवाईही करता येत नाही. हीच संधी साधून विना क्रमांक वाहनधारक सर्रास वाहतूक नियम पायदळी तुडवून परत वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याचे आव्हाण देत आहेत. या आव्हाणांपुढे वाहतूक पोलिसही लाचार होत असल्याची परस्थिती शहरात सर्वत्र दिसून येत आहेत.

कितीही फोटो काढा

उच्च न्यायालयाच्या सिग्नलवर दोन दिवसांपूर्वी विना क्रमांक दुचाकीवर तीन तरुण जात होते. हे पाहून तेथील वाहतूक पोलिसांनी त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. हे पाहून त्या तीन तरुणांनी कितीही फोटो काढा आमचे काहीच होणार नाही असे आव्हाण देत सिग्नल तोडून पळून गेले. वाहतूक पोलिसाला त्या तरुणांकडे हताशपणे पाहत बसण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. अशा मुजोर वाहनधारकांवर वेळीच कारवाई करावी अशी मागणी सर्वसामांन्य वाहनधारकांकडून होत आहे.

कारवाई करू

वाहन विक्रेत्यांना विनाक्रमांक वाहने देणे चुकीचे आहे. आमचा ड्राईव्ह असतोच दरम्यान विनाक्रमांक वाहन देणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी करून लवकरच त्यांच्यासह वाहनधारकांवरही कडक कारवाई करण्यात येईल.
विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT