Sambhajinagar Crime : माथेफिरूने मध्यरात्री पाच दुचाकी जाळल्या File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : माथेफिरूने मध्यरात्री पाच दुचाकी जाळल्या

जय भवानीनगरत एकच खळबळः अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

man burns five bikes in the middle of the night

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

जय भवानीनगर येथील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या पाच दुचाकींना अज्ञात माथेफिरूने आग लावली. या आगीत सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. ही घटना ६ डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या दरम्यान घडली.

राजेंद्र लादूलालजी शर्मा (४३, रा. राजनगर) रुळापलीकडे असलेल्या छत्रपतीनगर परिसरात रस्ता नसल्याने नागरिक आपल्या दुचाकी जयभवानी नगर परिसरातील मोकळ्या जागेत उभ्या करतात. शर्मा यांनी नेहमीप्रमाणे ५ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कामावरून परतत आपली (एमएच-२०-ईक्यू-७८८९) दुचाकी येथे पार्क करून घरी गेले होते.

दरम्यान ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री एका माथेफिरूने तेथे उभ्या असलेल्या पाच दुचाकींना आग लावून पसार झाला. मध्यरात्रीनंतर गाड्यांना आग लागल्याची आरडा-ओरड सुरू झाली. आवाज ऐकून शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांच्या दुचाकीसह भानुदास मोरे यांची दुचाकी ८३४०), संतोष प्रभाताराव (एमएच-२०-ईएक्स-८५५५), उद्धव वाघ (एमएच-२०-सीएल-(एमएच-२०-सीएन-३२५४), कृष्णा सूर्यवंशी (एमएच-२०-ईझेड-७७९६) अशा चार ते पाच दुचाकी जळाल्याचे समोर आले. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT