Wild Boar Attack : रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

शेतात कापूस वेचणीचे काम करीत असताना अचानकपणे रानडुकराने हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाली.
Woman seriously injured in wild boar attack
Wild Boar Attack : रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमीFile Photo
Published on
Updated on

Woman seriously injured in wild boar attack

वरठाण, पुढारी वृत्तसेवा : शेतात कापूस वेचणीचे काम करीत असताना अचानकपणे रानडुकराने हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवार (दि.६) दुपारी एक वाजता अंजोंळा शिवारात घडली. कांताबाई जयसिंग परदेशी (वय ४२) रा. वाकडी असे जखमी महिलेचे नाव आहे.

Woman seriously injured in wild boar attack
Illegal Timber Transport : अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक पकडला

कांताबाई परदेशी अंजोळा

शिवारात गट न.१०८ मधील आपल्या शेतात कापूस वेचणीचे काम करीत असताना अचानकपणे रानडुकराने यांच्यावर हल्ला करीत माडीला कडाडून चावा घेऊन गंभीररीत्या जखमी केले आहे. या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाकडीसह अंजोळा, तिडका, वरठाण, बनोटी, परीसरात रानडुकरांचा मोठा उपद्रव वाढला असून दिवसेंदिवस रानडुकरांची संख्यादेखील वाढत असून रब्बी पिकातील लागवड केलेल्या मका पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. त्यातच शेतकरी त्यांना हुलकावणीसाठी जात असताना अंगावरदेखील धावून येत असल्याचे काही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

Woman seriously injured in wild boar attack
Robbery Case : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले तिघे जेरबंद

वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जयसिंग परदेशी, गोकुळ परदेशी, पोपट परदेशी, बाळू धुमाळ आदी शेतकऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news