Vitthal-Rukmini Temple : वाळूज पंढरपुरात आषाढीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल file photo
छत्रपती संभाजीनगर

Vitthal-Rukmini Temple : वाळूज पंढरपुरात आषाढीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल

२५ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत ए. एस. क्लब ते कामगार चौक रस्ता राहणार बंद

पुढारी वृत्तसेवा

Major traffic changes in Waluj and Pandharpur for Ashadhi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज परिसरातील मौजे पंढरपूर येथील प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरणार आहे. या यात्रेसाठी १५० ते २०० दिंड्या आणि हजारो भाविक दाखल होणार असल्याने, भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

२४ जुलै (शुक्रवार) रोजी रात्री ८ वाजेपासून ते २५ जुलै (शनिवार) रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू राहतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली.

हे' मुख्य मार्ग राहतील पूर्णपणे बंद

ए.एस. क्लब चौक ते कामगार चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. ओअॅसिस चौक ते आंबेडकर चौक (एफडीसी कॉर्नर) हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. इसारवाडी फाटा ते कामगार चौक पर्यंतचा रस्ता सर्व जड वाहनांसाठी बंद राहील. नगर नाका ते ए.एस. क्लब चौक हा रस्ताही सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद राहील.

एसटी, ट्रॅव्हल्स आणि जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगरकडून अहिल्यानगर-पुणेकडे जाणाऱ्या एसटी बस व खासगी ट्रॅव्हल्स महानुभाव आश्रम चौक, कांचनवाडी, चित्तेगाव-बिडकीनमार्गे इसारवाडी फाट्यावरून पुढे अहिल्यानगर-पुणेकडे जातील.

जालना-बीडकडून येणारी जड व हलकी वाहने : महानुभाव आश्रम चौक, कांचनवाडी, चित्तेगाव-बिडकीनमार्गे इसारवाडी फाट्यावरून अहिल्यानगर-पुणेकडे जातील. धुळे व एमआयडीसी वाळूजकडून येणारी जड वाहने : साजापूर फाटा, ए.एस. क्लब ब्रिजवरून, कांचनवाडी ब्रिजखालून पैठण रोडने, चित्तेगाव-बिडकीनमार्गे इसारवाडी फाट्यावरून जातील.

पुणे-अहिल्यानगरकडून जालना-बीड-नाशिक-धुळे- जळगावकडे जाणारी अवजड वाहने : इसारवाडी, बिडकीन, वाल्मी नाका, कांचनवाडीमार्गे नवीन सोलापूर-धुळे हायवेमार्गे पुढे जातील.

हलक्या वाहनांसाठी असा असेल मार्ग:

छत्रपती संभाजीनगरकडून पुणे-अहिल्यानगरकडे : नगर नाका, ए. एस. क्लब चौक, पडेगाव, मिटमिटा, तिसगाव चौफुली किंवा साजापूर गावातून एनआरबी चौक, रांजणगाव, एफडीसी कॉर्नर-कामगार चौकमार्गे पुढे जातील. पुणे-अहिल्यानगरकडून छत्रपती संभाजीनगर शहराकडे: पाटोदा टी, संताजी चौकी, वाल्मी नाका, महानुभाव चौकामार्गे वाहने शहरात प्रवेश करतील. पुणे-अहिल्यानगरकडून धुळे-नाशिककडे : कामगार चौकातून डावीकडे वळून एफडीसी कॉर्नर, रांजणगाव, एनआरबी चौक, साजापूर गावातून पुढे राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर हायवेने जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT