Major Reshuffle as SP Prakash Jadhav Takes Charge; 27 Officers Transferred
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीणचे पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी पदभार घेताच मोठे फेरबदल केले आहेत. तब्बल पोलिस अधिकाऱ्यांच्या २७प्रकाश जाधव बदल्यांचे आदेश रविवारी (दि.३१) काढले आहेत. जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या शनिवारी (दि.३०) झालेल्या बैठकीनंतर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या, सर्वसाधारण बदल्या आणि नव्याने हजर झालेल्या अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचा समावेश आहे.
प्रशासकीय कारणास्तव आणि विहित कालावधी पूर्ण झाल्याने १७ अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ८ सहायक निरीक्षक (सपोनि) आणि ९ उपनिरीक्षकांचा समावेश आहे. सपोनि अमोल ढाकणे यांची जिवीशा, सपोनि रामचंद्र पवार यांची पोअ वाचक, सपोनि ईश्वर जगदाळे यांची दुय्यम अधिकारी चिकलठाणा, सपोनि शिवाजी नागवे यांची अपोअ वाचक, सपोनि संभाजी वडते यांची दुय्यम अधिकारी खुलताबाद, सपोनि प्रफुल्ल साबळे यांची कनव्हिक्शन सेल, सपोनि पंकज बारवाल यांची दविशा आणि सपोनि समाधान पवार यांची सायबर येथे पदस्थापना झाली आहे. उपनिरीक्षकांमध्ये (पोउपनि) बाबु मुंडे (कन्नड ग्रामीण), राम बारहाते (फुलंब्री), संतोष झोरे (सुरक्षा शाखा), चॉद मेंढके (शिऊर), धम्मदिप काकडे (सिल्ल पेड शहर) आणि लहुजी घोडे (स्थागुशा) यांची बदली करण्यात आली आहे.
सात पोलिस ठाण्यात नवे प्रभारी ८ अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून सिल्लोड शहर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ७ सहायक निरीक्षकांना (सपोनि) विविध पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. दिनकर गोरे (सोयगाव), सुधीर मोटे (फर्दापूर), पवन इंगळे (अजिंठा), नारायण गिते (कन्नड ग्रामीण), कुणाल सूर्यवंशी (पिशोर), भरत मोरे (एम-पैठण), विजयसिंग जोनवाल (वडोदबाजार) यांचा समावेश आहे.
नव्याने हजर झालेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
ग्रामीण पोलिस दलात नव्याने हजर झालेले सपोनि प्रमोद भिंगारे यांची सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात, तर सपोनि विशाल बोडखे यांची खुलताबाद पोलिस ठाण्यात दुय्यम अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
३ अधिकाऱ्यांना मुदतवाढ
उत्कृष्ट कामगिरीच्या पार्श्वभूमीवर उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे (चिकलठाणा), राम हत्तरगे (आगुशा) आणि रंजना पाटील (हायकोर्ट पैरवी) या तीन अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्याच ठिकाणी एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.