Law Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Fraud Case : मालकी नसतानाही ३५ लाखांना विकला भूखंड

मुख्य आरोपीला समानेचा न्याय देता येणार नाही - न्यायालय

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ३५ लाख रुपयांच्या भूखंड व्यवहारातील कथित फसवणूक प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी के. एम. कायंगुडे यांनी मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

मोहम्मद एजाज मोहम्मद रियाज याने जालाननगर येथील सीटीएस क्रमांक १८८९४ असलेला भूखंड फिर्यादी शेख शाहेद शेख निजाम यांच्या पत्नी सिद्दीकी यास्मीन यांना विकण्याचा करार करून ३५ लाख रुपये इसार रक्कम म्हणून स्वीकारल्याचा आरोप आहे. मात्र संबंधित भूखंड त्याच्या मालकीचा नसल्याचे तपासातून समोर आले.

बचाव पक्षाने हा वाद पूर्णपणे दिवाणी स्वरूपाचा असल्याचा युक्तिवाद केला. संबंधित भूखंडाच्या मालकाच्या वारसांकडून मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे विक्रीखत करता आले नाही, असे सांगितले. आरोपीने व्यवहार रद्द करण्यासाठी करारही केला असून, रक्कम परत देण्यासाठी धनादेश दिले होते, असा दावाही करण्यात आला.

मात्र सरकार पक्षाने आरोपी हा संपूर्ण कटाचा सूत्रधार असल्याचा दावा केला. मोठ्या आर्थिक व्यवहारात फसवणूक करण्यात आल्याने हा गंभीर आर्थिक गुन्हा असल्याचे नमूद केले. धनादेशही वटले नसल्याने आरोपीची फसवणूक सुरुवातीपासूनच करण्याची मानसिकता दिसून येते, असा युक्तिवाद वकिलाने न्यालयात केला.

आरोपीचा जामीन फेटाळला

न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना,आरोपीने स्वतः मालक नसतानाही भूखंड विक्रीचा करार केला आणि मोठी रक्कम स्वीकारल्याचे नमूद केले. तसेच संबंधित जमीन संपादित झालेली असतानाही त्यानंतर व्यवहार करण्यात आल्याचे दस्तऐवजांवरून दिसून येत असल्याचे न्यायालयाने म्हटले.

३५ लाख रुपयांपैकी एकाही पैशाची वसुली झालेली नसल्याने आरोपी फरार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. इतर मिळाला असला, तरी त्यांची भूमिका वेगळी असून, मुख्य आरोपीला समानतेचा लाभ देता येणार नाही, असेही न्यायालयाने सहआरोपींना अटकपूर्व जामीन नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT