Mahavitaran News : महावितरणची धडक कारवाई : १३ जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा (Pudhari File Photo)
छत्रपती संभाजीनगर

Mahavitaran News : महावितरणची धडक कारवाई : १३ जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा

अब्दीमंडी व शरणापूर परिसरात महावितरणच्या दौलताबाद शाखेने केलेल्या तपासणी मोहिमेत मीटरमध्ये छेडछाड करून तसेच थेट आकडा टाकून वीजचोरी होत असल्याचे उघड झाले.

पुढारी वृत्तसेवा

Mahavitaran takes drastic action: 13 people charged with electricity theft

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अब्दीमंडी व शरणापूर परिसरात महावितरणच्या दौलताबाद शाखेने केलेल्या तपासणी मोहिमेत मीटरमध्ये छेडछाड करून तसेच थेट आकडा टाकून वीजचोरी होत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी १३ जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात १६ हजार ९२९ युनिट वीज चोरी झाली असून, ३ लाख ८५ हजार ४२९ रुपयांचे महावितरणचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अब्दीमंडी परिसरात महावितरणच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीत काही ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड करून तसेच सर्व्हिस वायरच्या साहाय्याने वीजवाहिनीवर थेट आकडा टाकून वीज वापर केल्याचे आढळून आले. संबंधित घरांमध्ये विद्युत भाराची नोंद घेण्यात आली. तसेच वीजचोरीसाठी वापरलेल्या वायर व अन्य साहित्य जप्त केले. याप्रकरणी छावणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

अब्दीमंडीत दोघांवर कारवाई अब्दीमंडी येथील नुरैन फार्म हाऊस आणि इकलास अहमद जमील अहमद यांच्याकडून मीटरमध्ये छेडछाड करून तसेच आकडा टाकून वीजचोरी करण्यात आल्याचा आरोप आहे. या दोघांकडून १० हजार ७७३ युनिट वीज वापरल्याचे निष्पन्न झाले असून त्यापोटी २ लाख ६९ हजार ८२६ रुपयांचे वीजबिल आकारण्यात आले आहे.

शरणापूरमधील ११ जणांवर गुन्हा

शरणापूर येथील गुणाजीराव गायकांबळे, नितीन हिवाळे, कडूबा पांडे, गुलाबराव पांडे, कृष्णा पवार, ऋषिकेश पाटोळे, सुनिल कांबळे, अनिल भुजंग, विजय पांडे, अरुण सरोदे आणि प्रेमकुमार रोडे या ११ जणांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ६ हजार १५६ युनिट वीज चोरी झाल्याचा दावा करण्यात आला असून त्याची रक्कम १ लाख १५ हजार ६०३ रुपये इतकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT