महाशिवरात्रीनिमित्त 20 जादा बसचे नियोजन File Photo
छत्रपती संभाजीनगर

Mahashivratri Special Bus Service : महाशिवरात्रीनिमित्त 20 जादा बसचे नियोजन

जादा बसची व्यवस्था 14 ते 15 फेबुवारी अशी दोन दिवस केली आहे

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यातील वेरूळ, धोत्रा, मुर्डेश्वर व वाकी येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी जात असतात, त्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्वच आगारांतून जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी 20 जादा बसचे नियोजन असून ऐनवेळी मागणीनुसार बस पुरवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक संतोष घाणे यांनी दिली.

15 फेबुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ, वाकी, मुर्डेश्वर व धोत्रा येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. यासाठी जिल्ह्यातील विविध भागांतून भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात. यांना त्या त्या ठिकाणांवर जाण्यासाठी काही अडचण येऊ नये म्हणून एसटी महामंडळाने त्यांच्या सोयीसाठी जादा बसची व्यवस्था 14 ते 15 फेबुवारी अशी दोन दिवस केली आहे. जादा बस सर्वच आगारांतून सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मागणीनुसार जादा बस

वरील चारही ठिकाणी ग््राामीण भागांतून जास्त भाविक दर्शनासाठी जातात, त्यामुळे 20 जादा बस व्यतिरिक्त भाविकांकडून आणखी बसची मागणी झाल्यास त्यांना ऐनवेळी जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजनही एसटीकडून करण्यात आले आहे, अशीही माहिती घाणे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT