Sambhajinagar News : म. गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी घेतली सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : म. गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी घेतली सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट

यावेळी महात्मा गांधी मिशनचे फिरोज मिथीबोरवाला, इंद्रजित मोहिते, जॉन आदी उपस्थित होते.

पुढारी वृत्तसेवा

m. Gandhi's great-grandson Tushar Gandhi met CJP founder Abhijit Deepke

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी बुधवारी (दि. १९) सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या सिडको वाळूज महानगर-१ येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी महात्मा गांधी मिशनचे फिरोज मिथीबोरवाला, इंद्रजित मोहिते, जॉन आदी उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांशी बोलताना तुषार गांधी म्हणाले, "इच्छा असूनही जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होता आले नाही. मात्र, ज्या पद्धतीने हे आंदोलन झाले, ते माझ्यासाठी एक प्रकारचा सत्याग्रह आहे. देशाची युवा पिढी कधी जागृत होईल, याची मला नेहमीच प्रतीक्षा होती. माझ्या हयातीत हे घडले, याचा मला आनंद आहे. आता मी निवृत्त होऊ शकतो, असे प्रथमच आनंदाने वाटते."

सीजेपी आंदोलनाचा सर्वांत मोठा विजय हा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नसून, देशातील तरुण सरकारला प्रश्न विचारत आहेत, हा आहे. सीजेपीचे आंदोलन आता राष्ट्रीय आंदोलन बनले असून, ते कोणीही थांबवू शकत नाही.

हक्कांच्या या लढ्यात आम्ही समर्थकाची भूमिका बजावू, असे सांगत त्यांनी सीजेपीच्या 'शाळा दुरुस्त करा' मोहिमेचे कौतुक केले. अभिजीत दीपके म्हणाले, "महात्मा गांधी हे राष्ट्राचा आत्मा आहेत. सीजेपीचे शांततापूर्ण व अहिंसक आंदोलन गांधींनी दाखवलेल्या मार्गावर आधारित आहे. त्यामुळेच हे आंदोलन यशस्वी झाले. सीजेपीच्या चळवळीला अराजकतावादी, हिंसक आणि राष्ट्रविरोधी ठरविण्याचा प्रयत्न झाला; मात्र आज गांधी कुटुंब आमच्यासोबत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT