Lumpy outbreak reduced : लम्पीचा प्रादुर्भाव घटला; १५८३ जनावरे ठणठणीत तर ८४ चा मृत्यू File Photo
छत्रपती संभाजीनगर

Lumpy outbreak reduced : लम्पीचा प्रादुर्भाव घटला; १५८३ जनावरे ठणठणीत तर ८४ चा मृत्यू

लसीकरण, औषधोपचार, निर्जंतुकीकरण मोहिमेमुळे दिलासा

पुढारी वृत्तसेवा

Lumpy outbreak reduced; 1583 animals recovered, 84 died

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पशुधनावर लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढला असला तरी उपचार व नियंत्रणात्मक उपाययोजनेमुळे परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. जिल्ह्यातील एकूण ४ लाख १३ हजार पशुधनापैकी १९९० जनावरे बाधित झाली आहेत. त्यापैकी १५८३ जनावरे उपचारानंतर पूर्णपणे ठणठणीत झाली असून, ८४ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

लम्पी रोग प्रामुख्याने गायी आणि म्हशींमध्ये विषाणूजन्य या आजारामुळे त्वचेवर गाठी येणे, ताप येणे अशी लक्षणे दिसतात. जुलै २०२५ पासून जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पशुमालकांतून होत होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. नानासाहेब कदम यांना तातडीने उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हाभर लसीकरण, औषध आढळतो. ोपचार व निर्जंतुकीकरण मोहीम राबवण्यात आली. पशुसंवर्धन विभागाच्या १२३ पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत सर्व पशुधनांचे लसीकरण करण्यात आले असून, ४० ते ४५ हजार गोठ्यांचे निर्जंतुकीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

या उपाययोजनांमुळे लम्पी बाधित जनावरांची प्रकृती वेगाने सुधारत असून, रोगाचे प्रमाण नियंत्रणात आल्याचे पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम यांनी सांगितले.

अद्ययावत आकडेवारी

एकूण पशुधन : ४१३०००

लसी उपलब्ध: ४१९०००

लसीकरण पूर्ण (बूस्टरसहित)

: ४१९०००

एकूण बाधित जनावरे १९९०

ठणठणीत झालेले : १५८३

मृत्यू: ८४

उपचाराधीन : ३२३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT