Lumpy Disease: Lumpy killed twenty-four animals in one and a half months
बाबरा, पुढारी वृत्तसेवा : फुलंब्री तालुक्यातील बावरा, बाभुळगाव (खुर्द) या दोन गावांत लम्पी आज-ाराने एक ते दीड महिन्यात लहान मोठे तब्बल चोवीस जनावरे दगावल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कान्हेगाव, तर चिंचोली, हिवरा, सोनारी, बोधेगाव, लिला जाहागिर, आदी गावांच्या परिसरात लम्पी आजाराची लक्षणे दिसत आहे. याबाबत पशुपालकांनी पशुवैद्यकीय विभागाकडे तक्रारी करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची मदत पशुपालकांना न मिळाल्याने लाखो रुपयांचे पशुधन दगावले. यामध्ये दुभत्या गायी, बैलजोडी, लहान वासरांचा समावेश आहे. दुसरीकडे अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे, शेतकरी दोन्ही बाजूने आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी बाबरासह परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.
दरम्यान परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यासह विविध पदे रिक्त असल्याने पशुपालकांच्या जनावरांना वेळेवर उपचार न मिळाल्याने दीड महिन्यात तब्बल चोवीस जनावरे दगावली आहेत. तसेच अनेक जनावरांने लम्पी आजाराने ग्रस्त असल्याने पशुपालकांमध्ये भीती पसरली आहे.