Sambhajinagar News : लुब्रिझोलची एक्झिट : १२० एकर जागेसाठी शंभर उद्योग रांगेत file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : लुब्रिझोलची एक्झिट : १२० एकर जागेसाठी शंभर उद्योग रांगेत

बिडकीन येथील 'ऑरिक सिटी' (डीएमआयसी) मध्ये 'लुब्रिझोल'ने त्यांच्या प्रस्तावित प्रकल्पातून अंतर्गत अडचणीमुळे माघार घेतली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Lubrizol's Exit: A Hundred Industries Line Up for 120-Acre Site

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा बिडकीन येथील 'ऑरिक सिटी' (डीएमआयसी) मध्ये 'लुब्रिझोल'ने त्यांच्या प्रस्तावित प्रकल्पातून अंतर्गत अडचणीमुळे माघार घेतली आहे. कंपनीच्या या 'एक्झिट'मुळे रिकामी झालेल्या १२० एकरची जागा ही आता इतर उद्योजकांसाठी मोठी संधी ठरत असून, हा भूखंड मिळवण्यासाठी शंभरपेक्षा अधिक उद्योग वेटींगवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लुब्रिझोलने जुलै २०२४ मध्ये राज्य शासनासोबत सामंजस्य करार करून बिडकिनमध्ये सुमारे १,९१४ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले होते. या प्रकल्पातून सुमारे ९०० रोजगारनिर्मिती अपेक्षित होती. मात्र, कंपनीने आपल्या व्यावसायिक धोरणातील बदलांमुळे बिडकीन येथील प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

या माघारीनंतर १२० एकर जमीन मोकळी झाली असून ती पुन्हा लिलावात काढली जाणार आहे. कॉस्मो फिल्म्स, जेएसडब्ल्यू आणि रुचा इंजिनिअरिंग यांसारख्या उद्योगांच्या शेजारी असलेला हा भूखंड अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे हा भूखंड पुन्हा उपलब्ध झाल्यानंतर त्यासाठी उद्योजकांकडून मोठी मागणी निर्माण झाली आहे.

१०० हून अधिक संभाव्य गुंतवणूकदार या भूखंडासाठी प्रतीक्षेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. लुब्रिझोलने भारतातील गुंतवणुकीतून पूर्णपणे माघार घेतलेली नाही. कंपनीने गुजरातमध्ये ग्रासिम इंडस्ट्रीजसोबत सीपीव्हीसी रेझिन प्रकल्पासाठी १,४३५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे बिडकिनमधून घेतलेला निर्णय हा कंपनीच्या बदललेल्या व्यावसायिक धोरणाचा भाग असल्याचे मानले जात आहे.

ऑरिकमध्ये गुंतवणूकीसाठी चढाओढ

या आंतरराष्ट्रीय कंपनीने माघार घेतली असली, तरी बिडकीन डीएमआयसीचा प्रभाव कमी झालेला नाही. डीएमआयसीमधील पुढील टप्प्यासाठी शंभरहून अधिक देशी व परदेशी कंपन्यांनी गुंतवणुकीची उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे लुब्रिजोलच्या एक्झिटमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अनेक मोठे उद्योग रांगेत उभे आहेत.

रोजगार निर्मितीची संधी

छत्रपती संभाजीनगर क्षेत्रातील औद्योगिक मागणी घटलेली नसून ती अधिक वैविध्यपूर्ण झाली आहे. लुब्रिजोल बाहेर पडल्याने मोकळा झालेला हा भूखंड आता इतर नव्या आणि मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योगांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT