Sambhajinagar Crime : कट्टा - काडतूस, मिरची पावडर, लाठीः दरोडेखोरांचा मोठा बेत उधळला! File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : कट्टा - काडतूस, मिरची पावडर, लाठीः दरोडेखोरांचा मोठा बेत उधळला!

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, दोन दरोडेखोर पकडले, चौघे फरार

पुढारी वृत्तसेवा

Local Crime Branch raids, two robbers arrested, four absconding

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्यातील दोघांना छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रा.) पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व इतर साहित्यांसह ताब्यात घेतले. अमोल साईराम गायकवाड व गोविंद निवृत्ती पवार (दोघे रा. बेलगाव ता. वैजापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे असून लक्ष्मण ऊर्फ लखन नामदेव जगताप, विक्रम ऊर्फ विकी बाळासाहेब बोरगे (दोघे रा. भग्गाव, ता. वैजापूर) व इतर दोन इसम ज्यांची नावे माहीत नाहीत असे चौघेजण घटनास्थळाहून पळून गेले.

याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे (ग्रा.) पोलिसांचे पथक वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांतील गुन्हेगार यांचा शोध घेत असताना त्यांना त्यांचे गुप्त बातमीदार यांचेकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, मुंबई नागपूर हायवेलगत बेलगाव शिवारातील इंडियन ढाब्यासमोर कारमध्ये पाच ते सहाजण थांबलेले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.

अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्था. गु.शा. पथक यांनी सदर माहिती ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना दिली. पो.नि. राजपूत यांनी सदरची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना कळविली. सदर बातमीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर (ग्रा.) डॉ. विनयकुमार राठोड व अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शाचे पोनि राजपूत यांनी संशयितांना पकडण्याकरिता योग्य नियोजन करून सापळा लावून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी कारमध्ये बसलेले इसम यांच्यावर अचानक जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी दोन इसम यांना जागेवरच पकडले.

परंतु इतर चारजण हे अंधाराचा व शेजारील मका पिकाचा फायदा घेत पळून गेले. पकडेलेले इसम यांना पथकाने विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे अमोल गायकवाड व गोविंद पवार (रा. बेलगाव) असल्याचे सांगून पळून गेलेले दोघांचे नावे लक्ष्मण ऊर्फ लखन जगताप व विक्रम ऊर्फ विकी बोरगे व इतर दोन इसम यांची नावे माहीत असे नसल्याचे कळविले. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नियोजनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो. उपनिरीक्षक, महेश घुगे, पोह श्रीमंत भालेराव, सचिन राठोड, बलविरसिंग बहुरे, पो. अं. शिवाजी मगर यांनी केली.

१ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिस पथकाने असलेली कारची झडती घेतली असता त्यामध्ये दरोडा टाकण्यासाठीचे एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, नायलॉन दोरी, वायर कापण्याचे कटर, पत्रा कापण्याचे कटर, हातोडी, छन्त्री, लोखंडी पकड, लोखंडी पान्हा, लोखंडी सळई, चाकू, सी.सी.टीव्हीवर मारण्याचे काळ्या रंगाचे स्प्रे, एक्साब्लेड, चेहऱ्याचे मास्क, मिरची पावडर, अंबरदिवा, सायरन, पोलिस लाठी, रेगजीन सँग, दोन मोबाईल असा एकूण १ लाख ५९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT