शिंदेवाडी फाटा परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला File Photo
छत्रपती संभाजीनगर

शिंदेवाडी फाटा परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला

गुप्तांगावर शस्त्राने वार, सात जणांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Life-threatening attack on a youth in the Shindewadi Phata area

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील शिंदेवाडी फाटा परिसरात एका तरुणाला अज्ञात सहा ते सात जणांनी अमानुष मारहाण करून धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गंभीर जखमी तरुणावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि.२८) सायंकाळी सुमारे ७.१५ वाजेच्या सुमारास तरुण हा प्रवरा संगम येथून आपल्या गावाकडे टेम्पोने निघाला होता. शिंदेवाडी फाटा, लासूर रोड परिसरात त्यांचा टेम्पो थांबल्यानंतर मागून आलेल्या एका चारचाकी वाहनातून सहा ते सात अज्ञात व्यक्ती खाली उतरले. इंडिकेटर का लावला नाही, असा किरकोळ वाद काढत त्यांनी तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.

हल्लेखोरांपैकी एकाने लोखंडी रॉडने तर दुसऱ्याने धारदार शस्त्राने तरुणाच्या गुप्तांगावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. मारहाणीनंतर आरोपींनी त्याचे कपडे काढून त्याला निर्जन ठिकाणी फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. जखमी अवस्थेत असलेल्या तरुणाने कसाबसा संपर्क साधत मदत मागितली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव त्याला उपचारासाठी प्रथम गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, पीडिताच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात सहा ते सात जणांविरुद्ध मारहाण व जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT