Child Marriage : बालविवाह रोखण्यासाठी आता शाळांमध्येच दिले जाणार धडे file photo
छत्रपती संभाजीनगर

Child Marriage : बालविवाह रोखण्यासाठी आता शाळांमध्येच दिले जाणार धडे

पाटीवर मुळाक्षरे गिरवण्याच्या आणि खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलींना थेट बोहल्यावर चढवले जात असल्याचे प्रकार आजही घडत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Lessons to prevent child marriage will now be given in schools

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: पाटीवर मुळाक्षरे गिरवण्याच्या आणि खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलींना थेट बोहल्यावर चढवले जात असल्याचे प्रकार आजही घडत आहेत. वारंवार जनजागृती करूनही छुप्या पद्धतीने बालविवाह सुरूच असून, यंदाची दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या स्थलांतरामुळे यात अधिकच भर पडली आहे. परिणामी, शहरासह जिल्ह्यात गेल्या ८ ते ११ महिन्यांत जिल्हा महिला व बालविकास विभागाने ४६ बालविवाह रोखले आहेत.

मुला-मुलींचे बालपण हिरावले जाऊ नये आणि कोवळ्या वयात त्यांच्यावर लग्नाची जबाबदारी पडू नये, यासाठी आता थेट शाळांमधूनच बालविवाहविरोधात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या 'बालविवाहमुक्त भारत' अभियानांतर्गत ही प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

या मोहिमेसंदर्भात माहिती देताना माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी सांगितले की, बालविवाह रोखण्यासाठी पाठ्यपुस्तकांवर हेल्पलाइन क्रमांक देण्यात आले आहेत. तसेच, शाळांनी आपल्या परिसरात बालविवाह होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि विद्यार्थ्यांशी संवाद वाढवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT