Leopard kills newborn calf, farmers fear
पिशोर, पुढारी वृत्तसेवा : गोठ्यात बांधलेल्या गीर गायीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून फडशा पाडला. ही घटना मंगळवारी रात्री पिशोर वन विभागाच्या हद्दीतील कोळंबी मांजरा शिवारात घडली.
मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शेतकरी रामू भिमाजी नवले यांनी आपल्या मालकीच्या गट क्रमांक ४२ मध्ये जनावरांसाठी पत्राचा गोठा बांधलेला असून, मंगळवारी सहा वाजता जनावरांना गोठ्यात बांधून घरी आले व मंगळवारी रात्रीच पाणी भरण्यासाठी शेतात गेले असता गोठ्यात गीर गायीचे वासरू मृत अवस्थेत आढळून आले.
बुधवारी सकाळी वनरक्षक कृष्णा माळी व वनमजूर मगरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.