AI-based helpline : शेतकरी जीवन संपवण्याच्या घटना रोखण्यासाठी एआय आधारित हेल्पलाइन सुरू करा file photo
छत्रपती संभाजीनगर

AI-based helpline : शेतकरी जीवन संपवण्याच्या घटना रोखण्यासाठी एआय आधारित हेल्पलाइन सुरू करा

हर्षवर्धन जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

Launch an AI-based helpline to prevent incidents of farmers ending their lives

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांना आळा घालण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून विशेष हेल्पलाइन सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतेच मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.

राज्यात दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाला मिळणारा कमी भाव, बाजारपेठेतील मंदी, आर्थिक अडचणी तसेच शैक्षणिक आणि रोजगाराच्या मर्यादित संधी यामुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नैराश्य वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला मदत मिळावी, यासाठी एआय आधारित हेल्पलाइन उपयुक्त ठरू शकते, अशी संकल्पना जाधव यांनी मांडली आहे.

या हेल्पलाइनशी महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि बँका जोडण्यात याव्यात. एखाद्या व्यक्तीने किंवा तिच्या नातेवाइकांनी आत्महत्येच्या विचारातून हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास, संबंधित व्यक्तीच्या अडचणी समजून घेऊन त्याचवेळी संबंधित शासकीय विभाग आणि बँकांकडून आवश्यक माहिती व मदत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था असावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.

विशेष म्हणजे, ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली केवळ फोनवरील संवादापुरती मर्यादित न राहता मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर आधारित समुपदेशन करेल. मानसोपचारशास्त्रातील अभ्यास आणि माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तीशी संवाद साधून तिचे नैराश्य कमी करण्यास तसेच योग्य वेळी तज्ज्ञांची मदत मिळवून देण्यास ही प्रणाली सहाय्यभूत ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT