Land Acquisition : उद्योगांसाठी ८ हजार एकर भूसंपादनाला गती file photo
छत्रपती संभाजीनगर

Land Acquisition : उद्योगांसाठी ८ हजार एकर भूसंपादनाला गती

दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत प्रस्तावित वाढीव सुमारे आठ हजार एकर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला प्रशासनाने वेग दिला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Land acquisition of 8,000 acres for industries gains momentum

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत प्रस्तावित वाढीव सुमारे आठ हजार एकर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला प्रशासनाने वेग दिला आहे.

या प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणून लवकरच संबंधित जमीनधारकांना ३२ (२) अन्वये नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योगनगरीत प्रस्तावित भूसंपादनासाठी एमआयडीसी, महसूल प्रशासनासह भूमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम, वन आणि कृषी विभागाचे संयुक्त पथक प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन पाहणी करणार आहे.

या पथकाकडून प्रत्येक भूखंडाची मोजणी, सीमा निश्चिती जमिनीवरील स्थावर तसेच मालमत्तेची नोंद केली जाणार आहे. यामध्ये संबंधित जमिनीवरील घरे, विहिरी, झाडे, रस्ते तसेच अन्य मालमत्तांचे पंचनामे करून त्या आधारे पुढील भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येईल. डीएमआयसीच्या विस्तारासाठी प्रस्तावित वाढीव क्षेत्रातील भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर ऑरिक औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराला चालना मिळणार असून, नव्या उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT