Knife attack : मुलांना नशेच्या गोळ्या देण्यावरून जाब विचारणाऱ्या पित्यावर चाकूहल्ला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Knife attack : मुलांना नशेच्या गोळ्या देण्यावरून जाब विचारणाऱ्या पित्यावर चाकूहल्ला

एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Knife attack on father who asked him to answer for giving drug pills to children

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मुलांना नशेच्या गोळ्या देण्यापासून रोखल्याचा राग आल्याने एकाने जावेद इरफान पठाण (३८, रा. माणिकनगर) यांच्या छातीवर चाकू मारून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि.२) रात्री पावणेअकाराच्या सुमारास माणिकनगर येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवेज सय्यद आमेर, सोनी, जमील आणि माजीद अशी आरोपींची नावे आहेत.

जावेद यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरासमोर राहणारा परवेज हा त्यांच्या मुलांना नशेच्या गोळ्या देत असे. जावेद यांनी त्याला यापूर्वीही समज दिली होती. २ जुलै रोजी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास जावेद हे परवेजला पुन्हा समजावून सांगण्यासाठी गेले असता, याचा राग आल्याने परवेजने दुचाकीच्या चावीला असलेला छोटा चाकू थेट जावेद यांच्या छातीवर मारून पोटापर्यंत ओरखडा करत जखमी केले. तसेच त्याची बहीण सोनी, तिचा नवरा जमील आणि परवेजचा भाऊ माजीद यांनी जावेद यांना मारहाण केली. अधिक तपास हवालदार खान करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT