शेतीच्या वादातून महिलेला मारहाण Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

शेतीच्या वादातून महिलेला मारहाण

नगरसेवक अप्पासाहेब हिवाळेंसह तिघांवर अॅट्रॉसिटी दाखल

पुढारी वृत्तसेवा

Kannada Woman Assaulted Over Land Dispute

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील हतनूर शिवारात शेतात नांगरणीच्या कारणावरून एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (दि.१) दुपारी २:३० वाजेच्या सुमारास हतनूर येथे घडली.

या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नगरसेवक आप्पासाहेब विनायकराव हिवाळे, प्रकाशसिंग गोविंदसिंग ठाकूर आणि सुभाषसिंग किसनसिंग परदेशी (सर्व रा. देवळाई) या तिघांविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ज्योती उत्तम बनकर (५०, रा. हतनूर ता. कन्नड, ह.मु. एन-१२ भारतमाता नगर, हडको) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची हतनूर शिवारात गट क्रमांक ३५७ मध्ये शेती आहे. बुधवारी (दि.१) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित आरोपी या शेतात नांगरणी करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन आले होते.

यावेळी ज्योती यांनी आरोपीना तुम्ही येथे का आला आहात? अशी विचारणा केली असता, दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, या वादातून नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे यांनी जातीवाचक शिवीगाळ करत ज्योती यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच इतर दोन आरोपींनीही शिवीगाळ करून फिर्यादी व उपस्थित साक्षीदारांना जिवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर महिलेने तात्काळ कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिसा अधिकारी अपराजीता अग्निहोत्री करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

दडपशाहीने शेती बळकावण्याचा प्रयत्न

हतनूर येथील गट क्रमांक ३५७ मधील शेतीवर माझे सासरे स्व. पांडुरंग कुशाबा बनकर यांचे सन १९५२ पासून (गेल्या ७० वर्षांपासून) कुळ आहे. ही शेती आमच्या कुटुंबाच्याच ताब्यात असून, आम्हीच ती कसतो. या जमिनीचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे हे दडपशाही करून आमची शेती बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादी ज्योती बनकर यांनी केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT