Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : पांढरी मोहल्ल्यात २७८५ किलो गांजा जप्त; चार जण ताब्यात

दीड लाखाचा मुद्देमाल जप्त; फरार आरोपीविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : शहरातील पांढरी मोहल्ला परिसरात गांजाची विक्री व साठवणूक करणाऱ्या संशयितांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत २ हजार ७८५.३४ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह रोख रक्कम असा एकूण १ लाख ४८ हजार ७८६.५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

पोलिसांच्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पांढरी मोहल्ला, येथील अफजल रंगरेज यांच्या राहत्या घरात कारवाई करण्यात आली. या ठिकाणी नसीम अफजल रंगरेज, आफताब अफजल रंगरेज, अफसाना शकर रंगरेज, व सानिया शकर रंगरेज यांच्याकडून गांजा जप्त करण्यात आला.

तसेच विविध गुन्ह्यांतील फरार आरोपी शकर रज्जाक रंगरेज याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींकडून गांजाच्या पारदर्शक प्लास्टिक पुड्या तयार करून त्याची विक्री केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जप्त गांजाची किंमत १ लाख ३९ हजार २६६.५० रुपये, तर गांजा विक्रीतून मिळालेले ९ हजार ५२० रुपये रोख पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

या कारवाईत सहायक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक श्रीमती आरती पवार, सक्षम अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गोरड, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश दिंडे, पोलिस निरीक्षक पानपाटील यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास निंभोरकर, संदीप कानकुटे, प्रतिभा निंभोरकर, सहाय्यक फौजदार नाशिर पठाण, पोलिस नाईक अमोल गायकवाड, मोईज बेग तसेच मयूर वाळुंजकर, संदीप घुगे, प्रमोद सोनवणे, महिला पोलिस कर्मचारी आशा पाटील, शीतल बारगळ व योगिता पाटील यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT