सुखराम लक्ष्मण मोरे  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chaff cutter machine accident : कुट्टी मशीनचा भोंगा तुटून शेतकऱ्याचा मृत्यू

कन्नड तालुक्यातील शिरसगाव येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : तालुक्यातील शिरसगाव येथे चारा कुट्टी करणाऱ्या मशीनचा भोंगा (ब्लो-अर) अचानक तुटून अंगावर पडल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. १४) दुपारी घडली. सुखराम लक्ष्मण मोरे (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुखराम मोरे हे शनिवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गट क्रमांक १३२ असलेल्या शेतात चारा कुट्टी करण्याचे काम करत होते. काम सुरू असताना अचानक कुट्टी मशीनचा भोंगा तुटून थेट त्यांच्या अंगावर आदळला. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. उल्फत परदेशी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

सुखराम मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी गोपीचंद हरचंद मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संदीप कनकुटे करत आहेत.

शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी

गह सोंगणीसह विविध कामांसाठी शेतकरी आत्याधिक औजारे, मशिनचा वापर करून शेतीचे कामे करतात. थोड्या चुकीमुळे शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो. घरातील करता पुरूष गेल्याने त्या कुटुंबावर आधार जातो. शिरसाग येथील घटना दुदैवी असून शेतात काम करताना शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT