JSW's EV car : डिसेंबरपर्यंत जेएसडब्ल्यूची ईव्ही कार बाजारात file photo
छत्रपती संभाजीनगर

JSW's EV car : डिसेंबरपर्यंत जेएसडब्ल्यूची ईव्ही कार बाजारात

बिडकीनच्या प्रकल्पातून दिवाळीपासून होणार प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

JSW's EV car to be launched in the market by December

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बिडकीन औद्योगिक वसाहतीमधील जेएसडब्ल्यूचा प्रकल्प प्रगतिपथावर असून, सूत्रांच्या मते या प्रकल्पातून दिवाळीपर्यंत प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होईल. तसेच या नोव्हेंबरपासून कारची बुकिंग सुरू होऊन, डिसेंबर किंवा नववषी जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष विक्री सुरू होणार आहे. यामुळे उद्योग जगतात उत्साहाचे वातावरण आहे.

टोयोटा-किलीस्कर, अथर, पिरामल फामी यासह अनेक मोठ्या कंपन्यांकडून छत्रपती संभाजीनगरातील औद्योगिक वसाहतीत गुंतवणूक करण्यात आली आहे. यामुळे मागील दोन वर्षांपासून येथील औद्योगिक हालचाली वाढल्या असून, यात इव्ही कार निर्माण करणाऱ्या जेएसडब्ल्यूचाही समावेश आहे. कंपनीकडून कामांना गती देत या दिवाळीपर्यंत प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बिडकीनमध्ये ५५० एकर विस्तीर्ण जागेवर जेएसडब्ल्यूचा प्लांट उभारणी अंतिम टप्यात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चेरी कंपनीसोबत जेएसडब्ल्यूने भागीदारी केली असून, त्यांच्या सहकार्याने संभाजीनगरच्या प्लांटमध्ये कारची असेम्ब्ली केली जाणार आहे. एनईव्ही (न्यू एंट्री व्हेईकल) चे उत्पादन नोव्हेंबर पासून सुरू होईल. संभाजीनगर येथील प्लांटमध्ये याची असेम्ब्ली होणार असल्याने येथील औद्योगिक क्षेत्रासाठी ही महत्त्वाची घडामोड ठरणार आहे.

पहिले मॉडेल ३५ लाखांचे

सूत्रांच्या मते कंपनीकडून निर्मतिी होणाऱ्या पहिल्या मॉडेलची किंमत ३५ लाख आणि त्यापुढे असणार आहे. हे उत्पादन भारत तसेच भारताबाहेरही विक्री होणार आहे. कंपनीचे दुसरे मॉडेल अंदाजे १८ ते २० लाख किमतीचे असू शकेल. याशिवाय आणखी दोन ते तीन मॉडेल्स आणण्याचाही कंपनी विचार करत आहे.

दर तासाला ६० चारचाकीचे उत्पादन

बिडकीन येथील प्लांटमध्ये दरवषी सुमारे ५ लाख युनिट्सचे उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दर तासाला ६० कार बनतील, अशी योजना आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT