Joint Meeting of Thackeray Sena Zilla Parishad Members; Internal Dispute Resolved
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिव-सेना ठाकरे गटात आरोप- प्रत्यारोपाचे नाट्य रंगले होते. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आपल्या काही जिल्हा परिषद सदस्यांवर भाजपकडून पैसे घेतल्याचे आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देत दानवे यांनीच आमचा १८ कोटींत शिंदे सेनेसोबत सौदा केल्याचा गंभीर आरोप संबंधित सदस्यांनी केला होता. त्यानंतर रविवारी दानवे आणि त्या सदस्यांमध्ये समेट घडून आल्याचे दिसून आले.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी रस्-सीखेच बघायला मिळाली. त्यावेळी भाजप आणि शिंदे सेनेने स्वतंत्रपणे अध्यक्ष वसविण्याची तयारी चालविली होती. त्यात शिंदे सेनेकडून ठाकरे सेनेला सोबत घेण्याचे प्रयत्न झाले. परंतु भाजपने ठाकरे सेनेच्या काही सदस्यांना गळाला लावत हा डाव अयशस्वी केला. शेवटी ऐनवेळी ठाकरे सेनेने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले.
या दरम्यान, दानवे यांनी आपल्याच पक्षाचे सदस्य संजय निकम आणि सोनवणे यांच्यावर भाजपकडून पैसे घेतल्याचे आरोप केले होते. त्यानंतर संजय निकम यांनी दानवे यांनीच आमचा १८ कोटी रुपयांमध्ये शिंदे सेनेसोबत सौदा केला होता, असा खळबळजनक दावा केला. यामुळे ठाकरे गटात फूट झाल्याचे बोलले जात होते. मात्र रविवारी दानवे यांनी बोलावलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीला संजय निकम आणि सोनवणे हेही उपस्थित होते. दानवे आणि त्यांच्यात समेट घडून आल्याचे यावेळी दिसून आले.
तर माझे दारिद्य दूर झाले असते
बैठकीवेळी सभागृहात येताच दानवे आणि जिल्हा परिषद सदस्य निकम यांच्यात आरोपांविषयी संवाद झाला. दानवे यांनी सुरुवातीलाच निकम यांच्याकडे पाहत दे ना बाबा माझे अठरा कोटी. मिळाले असते तर चांगले झाले असते. माझे दारिद्यं तरी संपले असते, असे म्हणत विषय काढला. त्यावर निकम यांनी तुम्ही माझ्या थैल्या काढल्या दादा असे म्हटले. त्यानंतर दानवे यांनी मला अठरा मिळाले असते तर तुम्हाला एकेक दिले असते