छत्रपती संभाजीनगर येथील 'इंदिरा आयव्हीएफ'मध्ये आता प्रगत एलआयटी आणि मायक्रो-टीसे तंत्रज्ञान File Photo
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर येथील 'इंदिरा आयव्हीएफ'मध्ये आता प्रगत एलआयटी आणि मायक्रो-टीसे तंत्रज्ञान

यामुळे वंध्यत्वाच्या गंभीर समस्यांशी झुंजणाऱ्या दाम्पत्यांना आता आशेचा नवा किरण मिळाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

'Indira IVF' in Chhatrapati Sambhaji Nagar now offers advanced LIT and Micro-TESE technologies.

छत्रपती संभाजीनगर

शहरातील 'इंदिरा आयव्हीएफ' केंद्रात आता मायक्रो-टीसे (Micro-TESE) ऑपरेटिंग मायक्रोस्कोप आणि लिम्फोसाईट इम्युनायझेशन थेरपी (LIT) या अत्याधुनिक सुविधांचा शुभारंभकरण्यात आला. यामुळे वंध्यत्वाच्या गंभीर समस्यांशी झुंजणाऱ्या दाम्पत्यांना आता आशेचा नवा किरण मिळाला आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फॉम्सीचे (FOGSI) राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह परदेशी, डॉ. श्रीनिवास गडप्पा (HOD, GMCH), डॉ. अजय माने आणि एओजीएस सचिव डॉ. भाग्यश्री रांजवन यांची उपस्थिती होती.

तज्ज्ञांच्या मते, मायक्रो-टीसे तंत्रज्ञानामुळे पुरुषांमधील शुक्राणू मिळवण्याची प्रक्रिया अधिक अचूक आणि प्रभावी होईल. एलआयटी (LIT) थेरपीमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित अडथळे दूर करून गर्भधारणेची शक्यता वाढवता येते.

इंदिरा आयव्हीएफचे वरिष्ठ कार्यकारी संचालक डॉ. धोंडिराम भारती आणि युरोलॉजिस्ट डॉ. संदीप बाठे यांनी स्पष्ट केले की, जागतिक दर्जाचे उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विज्ञानातील या नवाचारामुळे निःसंतान दाम्पत्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण होण्यास मोठी मदत होणार असून, या नवीन तंत्रज्ञानाचे वैद्यकीय क्षेत्रातून स्वागत होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT