Indian Iconography Workshop to be organized from today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागातर्फे २५ व २६ फेब्रुवारी रोजी दोनदिवसीय भारतीय मूर्तीशास्त्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन व बीजभाषण अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठातील माजी विभाग प्रमुख डॉ. माया पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
पाटील हिंदू मूर्तीशास्त्राचा उदय व विकास याविषयी भाष्य करणार आहेत. कार्यशाळेत डेक्कन कॉलेज, पुणे येथील डॉ. श्रीकांत गणवीर हे मूर्तीचे महत्त्व आणि मूर्तीची प्राचीनता या विषयावर तर ओशिन बंब हे मूर्तीशास्त्रातील मुद्रा, आसन आणि वाहन याचे महत्त्व विशद करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात अष्टदिखपाल व नवग्रहावर या मूर्तीवर डॉ. श्रीकांत गणवीर त्याचप्रमाणे गणपती, कार्तिक आणि सूर्य मूर्तीबद्दल ओशींन बंब मार्गदर्शन करतील. २६ फेब्रुवारी रोजी डॉ. श्रीकांत गणवीर बौद्ध मूर्तीशास्त्र व ओशिन बंब हे स्मारक शिळा, विरगळ, सतीशिळा आणि गदेगाळ याबद्दल सविस्तर माहिती देतील. त्यानंतर इतिहास विभागाच्या वस्तुसंग्रहालयामध्ये जैन मूर्तीचे प्रात्यक्षिक ओशिंग बंब हे विद्यार्थ्यांकडून करून घेतील.
कार्यशाळेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजिका डॉ. पुष्पा गायकवाड व इतिहास विभाग प्रमुख डॉ. गीतांजली बोराडे यांनी केले आहे.