Eknath Shinde vs Uddhav Thackeray  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

मनपा निवडणुकीत शिवसेनेचा पारंपरिक मतदार दुरावला

विभागल्याचा फटका, जुन्या शिवसैनिकांची भावना

पुढारी वृत्तसेवा

In the municipal elections, the Shiv Sena lost its traditional voters

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदाच्या महापालिका निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पहायला मिळाला. यंदाच्या निवडणुकीत ठाकरे सेना व शिंदे सेना असे दोन्ही गट मिळून शिवसेनेला केवळ १९ जागा राखण्यात यश आले.

उध्दव ठाकरे यांनी काँग्रेससोबत केलेली हात मिळवणी त्यामुळे पक्षात पडलेली उभी फूट हे शहरवासीयांना पटलेले नसून संघटन कौशल्याचा अभाव यासह अंतर्गत मतभेदाचा शिवसेनेच्या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. शहरातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलल्याने भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक ५७नगरसेवक निवडून आणत महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले.

मी दगड जरी उभे केले तर तेही या शहरातील नागरिक निवडून देतील असा अभिमान बाळगत शहरावर विशेष प्रेम करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची पूर्णतः वाताहत झाली आहे. गेल्या तीन दशकांपासून महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र दोन गटांत पक्ष विभागला गेल्यानंतर शहरातील पारंपरिक शिवसैनिक संभ्रमात पडल्याचे चित्र आहे. एकीकडे शिंदे गट आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे गट, या फुटीचा थेट परिणाम मतदानावर झाला. त्यातच उद्धव ठाकरे गटाने काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी अनेक जुन्या शिवसैनिकांना न पटणारी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारी शिवसेना काँग्रेसच्या सोबतीने दिसल्याने पारंपरिक मतदारांना न पटल्याने ते शिवसेनेपासून दुरावल्याचे बोलले जात आहे. तसेच दोन्ही शिव-सेना गटात संघटन कौशल्याचा अभाव समन्वयाचा अभाव असल्याने अपयश पदरी आल्याची भावना जुन्या शिवसैनिकांमधून व्यक्त केली जात आहे. भाजप शहरातील प्रमुख राजकीय शक्ती म्हणून पुढे आली असून शिवसेनाआता पूर्वीसारखी राहिली नसल्याची खंत शिवसैनिकांमधून व्यक्त करण्यात आली आहे.

निवडणुकीत धनशक्तीचा वापर शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाकडून १०० जागा लढवण्यात आल्या. वातावरण चांगले 6 होते. शहरात चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व मी आम्ही तिघांनी रणनीती ठरवून काम केले. यात आम्ही कुठे कमी पडलो. अंतर्गत गटबाजीचा फटका बसला का याची माहिती घेतली जाईल. मात्र, शेवटच्या दोन दिवसांत सत्ताधारी पक्षांकडून पैशांचा मोठ्याप्रमाणात वापर केला गेला. तसेच प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून काही गोष्टी करण्यात आल्या. त्यामुळे सत्ताधारी पक्षांकडून एकप्रकारे लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याचा प्रकार आहे.
- सुभाष पाटील, उपनेते, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
दुरावल्याचे बोलले जात आहे. तसेच दोन्ही शिव-सेना गटात संघटन कौशल्याचा अभाव समन्वयाचा अभाव असल्याने अपयश पदरी आल्याची भावना जुन्या शिवसैनिकांमधून व्यक्त केली जात आहे. भाजप शहरातील प्रमुख राजकीय शक्ती म्हणून पुढे आली असून शिवसेनाआता पूर्वीसारखी राहिली नसल्याची खंत शिवसैनिकांमधून व्यक्त करण्यात आली आहे.
राधाकृष्ण गायकवाड, माजी जिल्हाप्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT