छत्रपती संभाजीनगर

Car Accident : शिवाजीनगरात सुसाट स्कार्पिओने भाजी विक्रेत्यांना उडविले

अपघातात दोन महिला गंभीर जखमी; चालक पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

In Shivajinagar, a speeding Scorpio ran over vegetable vendors

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सुसाट स्कॉर्पिओ चालकाने भाजीपाल्याच्या हातगाड्यांना उडवत दोन विक्रेत्यांना उडविले. या भीषण धडकेत भाजीविक्रेत्यांची हातगाडी हवेत उडून दूरवर फेकल्या गेली. घटनेत खाली बसून भाजी विकणाऱ्या दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही थरारक घटना रविवारी (दि.४) शिव-ाजीनगरात मेहरसिंग नाईक कॉलेज रस्त्यावर दुपारी बाराच्या सुमारास घडली. सुमनबाई दगडू हिवाळे (५८) आणि बानुबी मोहंमद सय्यद (५७, दोघी रा. भारतनगर), अशी जमखी महिलांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, शिव-ाजीनगर ते मेहरसिंग नाईक कॉलेज रस्त्यावर दोन्ही बाजूंनी भाजीपाला विक्रेते बसलेले असतात. रविवारी (दि.४) भुयारी मार्गाकडून स्कॉर्पिओ गाडी (एमएच-०४- जीई- १४४१) सुसाट आली. मेहरसिंग नाईक कॉलेजकडे वळण घेत असताना अपघातानंतर कार थांबल्यामुळे संतप्त नागरिक आणि भाजी विक्रेत्यांनी चालकाला घेरले होते. मात्र घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक सुनील म्हस्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून, कारचालकाला ताब्यात घेतले आहे. त्याची कार पुंडलिकनगर पोलिसांनी जमा केली.

समोरून एक रिक्षा आल्याने त्याला हुलकावणी देण्याच्या नादात कारचालकाचे नियंत्रण सुटले. भाजीविक्रेत्याच्या हातगाडीला धडक देताच हातगाडी हवेत उडून दूरवर फेकल्या गेली. अन्य हातगाड्याही गाडीच्या धडकेत उलटल्या होत्या.

जवळच भाजीविक्रीसाठी बसलेल्या बानुबी सय्यद यांना गाडीने उडविले. बानुवी या हातगाडीजवळच बसलेल्या असल्याने हातगाडी आणि स्कार्पिओचा जबर मार लागला. पुढे या गाडीने सुमनबाई हिवाळे यांनाही धडक दिली. सुमनबाई या गंभीर जखमी झाल्या. या घटनेत भाजीपाल्याची नासधूस होऊन मोठे नुकसान झाले.

चालक पोलिसांच्या ताब्यात

अपघातानंतर कार थांबल्यामुळे संतप्त नागरिक आणि भाजी विक्रेत्यांनी चालकाला घेरले होते. मात्र घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक सुनील म्हस्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून, कारचालकाला ताब्यात घेतले आहे. त्याची कार पुंडलिकनगर पोलिसांनी जमा केली.

खडी ढिगाऱ्यामुळे अनेकांचे वाचले प्राण

स्कार्पिओ चालकाने दोन महिलांना धडक दिल्यानंतर खडी ढिगारावर जाऊन गाडी आदळली. या रस्त्यावर पुढे काही अंतरावर अशाच पद्धतीने अनेक भाजी विक्रते होते. खडी ढिगारा नसता तर त्याने अनेकांना चिरडले असते. या स्कार्पिओमध्ये तरुण चालकासह इतर दोघे होते, असे सांगितले जाते.

आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा भरधाव आयशरने दुचाकीला उडविले. या घटनेत एक जण ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. ही घटना शनिवारी (दि. ३) दुपारी बाराच्या सुमारास नारेगाव येथे घडली. युनूस रफिक पठाण (२२) असे मृताचे नाव आहे.

युनूस हा त्याचा मित्र लिकायत मस्जिद सय्यद (२२) दोघे बदनापूर येथून नारेगाव मार्गे शाहगंज येथे खरेदीसाठी दुचाकीने जात होते. काकडे मेडिकलसमोर दर्गावाली मस्जिदजवळ, नारेगाव येथे पाठीमागून भरधाव आलेल्या आयशर टेम्पो चालकाने (एमएच-१४-एलएक्स-२१७२) दुचाकीला उडविले. या धडकेत युनूस आणि लिकायत दोघेही गंभीर जखमी झाले. आयशर तेथेच सोडून चालक पसार झाला. युनूस पठाण याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी युनूसचे भावजी आरेफ चांद मोगल (३४, रा. टाकळी मियाँ, राहुरी, नगर) याच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात आयशरच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT