In Sambhaji Nagar, tributes were paid to Ajit Pawar at an all-party meeting
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राजकारणातील खोचक आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणातही शालीनता, संयम आणि शब्दांची मर्यादा जपत काम करणारे नेतृत्व आज हरपले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत कधीही कोणावर जहरी किंवा दुखावणारी टीका केली नाही. त्यांच्या सुसंस्कृत आणि संतुलित व्यक्तिमत्त्वाचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (दि.१) देवगिरी महाविद्यालयात आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत काढले.
यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, विजया राहटकर, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अब्दुल सत्तार, संजय केणेकर, अर्जुन खोतकर, सतीश चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख, दत्ता भांगे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आज शहरात अस्थिकलश दर्शन
दिवगंत अजित पवार यांचा अस्थिकलश आज सोमवारी (दि.२) शहरात येणार असून, देवगिरी महाविद्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सर्वांना या अस्थिकलशाचे दर्शन घेता येईल. त्यानंतर दुपारी २ वाजता गोदावरी नदी, कायगाव (ता. गंगापूर) येथे या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष आ. सतीश चव्हाण व शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी सांगितले.
आज अजितदादांना श्रद्धांजली वाहताना मन भरून येत आहेत. एखादी गोष्ट स्पष्टपणे सांगणे ही त्यांची भूमिका होती. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही झाले तर एखाद्या विषयात लगेच मध्यस्थी करून तो मार्गी लावणे अशी त्यांची कणखर भूमिका असायची.अतुल सावे, मंत्री
महापालिकेच्या निवडणुका संपल्या आणि २७ तारखेला कॅबिनेट होती. त्या बैठकीला दादा उपस्थित होते, दादांचे वैशिष्ट्य होते की, कोणतीही बैठक लावली तर ते चुकवत नव्हते... दादांकडे शिस्त म्हणजे शिस्त होती. दादा एक वादळ होते ते अचानक शांत झाले, वादळ कसे शांत झाले हे कोणालाही कळाले नाही. दादा या पिढीतील प्रभावी नेते होते.संजय शिरसाट, पालकमंत्री
कणखर नेतृत्व हरपले दादा गेले ही बातमी समजल्यानंतर सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. त्यांनी उद्धव साहेबांसोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. ते एक कणखर नेतृत्व होते. त्यांनी कधीही जातीवाद केला नाही. कामाच्या बाबतीत त्यांचा हातखंडा होता. त्यांनी अपघाताच्या आदल्या दिवशी सगळ्या फाईल क्लिअर केल्या कोणतेही पेंडनशी नव्हती. दादा आपल्यातून गेले, मात्र दादांची शिकवण घेऊन आपल्याला पुढे चालायचे आहे.- चंद्रकांत खैरे, माजी खासदार
दादांच्या जाण्याने तुमच्या आमच्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या आयुष्यात मोठी खिंड पडली आहे.
- कल्याण काळे, खासदार
आता नही कोई रहने को सदा दहर मे, हा हिंदी शेर सादर करून दादांबरोबर विरोधी पक्षनेता म्हणून वर्षभर काम केले आहे, असे सांगत श्रद्धांजली अर्पण केली.
- अंबादास दानवे, माजी विरोधी पक्षनेते
पंचवीस वर्षे दादांसोबत काम करण्याची संधी मिळाली. जशा पद्धतीने जीवनभर काम केले तसेच देवाकडे गेले.
- अब्दुल सत्तार, आमदार
आज दादा आपल्यात नाहीत, मात्र अजूनही विश्वास बसत नाही. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, पवार कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकमय आहे. प्रत्येक माणसाला विश्वास होता तो दादांपर्यंत गेला की त्यांचे काम नक्की होणार. आपण दिलदार नेता गमावला आहे, दादा विचाराने, कामाने आपल्या मध्येच आहेत.
- विजया रहाटकर (महिला