

UGC Equity Bill suspended: Ambedkarite organizations protest
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शैक्षणिक क्षेत्रातील जात, धर्म, भाषा, लिंग आधारित भेदभावाला प्रतिबंध करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रस्तावित केलेल्या यूजीसी इक्विटी रेग्युलेशन या नियमावलीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
रविवारी (दि.१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटसमोर विविध आंबेडकरी पक्ष-संघटनांनी आंदोलन करून या स्थगितीचा निषेध नोंदविला. यावेळी दौलतराव मोरे, डॉ. अनिल पांडे, सचिन निकम, डॉ. दीपक खिल्लारे, अरविंद कांबळे, चंद्रकांत रूपेकर, मिलिंद मोकळे, राहुल वडमारे, प्रा. सिद्धोधन मोरे, प्रा. देवानंद पवार, राष्ट्रपाल गवई, प्रा. सागर गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.