Crime News : तोतया पोलिसांनी भरदिवसा वृद्धाला लुटले pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : तोतया पोलिसांनी भरदिवसा वृद्धाला लुटले

आम्ही पोलिस आहोत. कालच उड्ड-ाणपुलाखाली मर्डर झाला आहे. त्यामुळे तुम्ही असे दागिने घालून फिरू शकत नाही, अशी बतावणी करत तोतया पोलिसांनी भरदिवसा एका ६६ वर्षीय वृद्धाला लुटले.

पुढारी वृत्तसेवा

Imposter police robbed an elderly man in broad daylight

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आम्ही पोलिस आहोत. कालच उड्ड-ाणपुलाखाली मर्डर झाला आहे. त्यामुळे तुम्ही असे दागिने घालून फिरू शकत नाही, अशी बतावणी करत तोतया पोलिसांनी भरदिवसा एका ६६ वर्षीय वृद्धाला लुटल्याचा प्रकार शनिवारी (दि.६) दुपारी १ वाजेच्या सुमारास एमआयटी कॉलेजसमोरच्या उड्ड णिपुलावर घडला. भामट्यांनी हातचलाखीने वृद्धाच्या गळ्यातील १४ ग्रॅमची सोन्याची साखळी आणि १ तोळ्याच्या दोन अंगठ्या हातोहात लंपास केल्या. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रामाश्रय बालेश्वर प्रसाद (६६, रा. कमळपुरा रोड, भगतसिंग शाळेमागे, रांजणगाव) यांच्या तक्रारीनुसार, ते लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. शनिवारी (दि.६) दुपारी १ वाजेच्या सुमारास ते रांजणगाव येथून त्यांच्या दुचाकीवरून बीड बायपासवरील ईरा हॉटेलजवळील त्यांच्या ऑफिसकडे जात होते.

त्यावेळी एमआयटी कॉलेजच्या उड्डाणपुलावरून जात असताना मागून विनाक्रमांकाच्या काळ्या रंगाच्या शाईन दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांना आवाज देऊन थांबवले. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी स्वतःची ओळख पोलिस म्हणून दिली. कालच उड्डाणपुलाखाली मर्डर झाला आहे.

त्यामुळे असे दागिने घालून फिरू नका, ते काढून खिशात ठेवा, अशी भीती त्यांनी प्रसाद यांना घातली. त्यानंतर प्रसाद यांच्या गळ्यातील १४ ग्रॅमची सोन्याची साखळी आणि बोटातील प्रत्येकी ५ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या त्यांनी काढून घेतल्या. हे दागिने एका कागदात गुंडाळल्याचे नाटक करून ती पुडी प्रसाद यांच्या हातात ठेवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT