Chhatrapati Sambhajinagar Crime : तोतया पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला लुटले

सोन्याच्या अंगठ्या लंपास करून हातात दिली दगडांची पुडी
Crime  News
Crime News pudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : आम्ही पोलिस आहोत, पुढे साहेबांची चेकिंग सुरू आहे, अंगावरील दागिने काढून ठेवा, अशी बतावणी करत दोन तोतया पोलिसांनी देवदर्शनासाठी निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला लुबाडले. ही घटना रविवारी (दि.31) सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरात घडली.

या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान. शहरात पुन्हा एकदा तोतया पोलिसांची टोळी सक्रिय झाल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. फिर्यादी उमराव मारोतीराव निकम (74, रा. विठ्ठलनगर, मुकुंदवाडी) यांच्या तक्रारीनुसार, रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास निकम आणि त्यांच्या पत्नी शोभा हे दोघे त्यांच्या स्कूटीवरून (एमएच 21 एसी 6080) कर्णपुरा येथे दर्शनासाठी निघाले होते. ते रामनगर येथील बसस्टॉप जवळील लाईफ हॉस्पिटलसमोरून जात असताना त्यांच्यामागून बुलेटवर दोन भामटे आले. त्यांनी निकम यांची दुचाकी थांबवली आणि आम्ही पोलिस आहोत,

Crime  News
Chhatrapati Sambhajinagar crime : सिडको ठाण्याच्या 100 फुटांवर तरुणाची हत्या, तब्बल 7 तासांनंतर पोहोचले पोलिस

आमच्या मागे मोठे साहेब आहेत. आमची चेकिंग चालू आहे, तुम्ही हातातील अंगठ्या काढून घ्या, असे दरडावून सांगितले. घाबरलेल्या निकम दाम्पत्याने त्यांच्या बोटांतील प्रत्येकी 4 ग््रॉमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून दिल्या. भामट्यांनी त्या अंगठ्या स्वतःकडे घेत एका कागदाच्या पुडीत बांधल्याचा बहाणा केला.

Crime  News
Chhatrapati Sambhajinagar Crime : संभाजीनगरात घरफोडीचा थरार; गुजरातमध्ये जाऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news