तोतया पोलिसांचा धुमाकूळ; खून झाल्याची थाप मारून दागिने पळवले (Pudhari File Photo)
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : तोतया पोलिसांचा धुमाकूळ; खून झाल्याची थाप मारून दागिने पळवले

तोतया पोलिस बनून नागरिकांना लुटणाऱ्या भामट्यांचा धुमाकूळ पुन्हा समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Imposter Police Go on a Rampage; Jewelry stolen after claiming murder

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: तोतया पोलिस बनून नागरिकांना लुटणाऱ्या भामट्यांचा धुमाकूळ पुन्हा समोर आला आहे. रेल्वेस्टेशनकडे तिकीट बुकिंगसाठी पायी जात असलेल्या हैदराबादच्या एका व्यक्तीला दोन भामट्यांनी क्रांती चौकात खून झाल्याची बतावणी करत त्या इसमाची अंगझडती घेण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील तब्बल ६८ हजारांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने पळवले. हा प्रकार २६ एप्रिल रोजी दुपारी वन विभागाच्या भिंतीलगत घडला.

ओमप्रकाश राजगोपाल भुतडा (५०, रा. हैदराबाद) हे छत्रपती संभाजीनगर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. २६ एप्रिल रोजी दुपारी ते परत हैदराबादला जाण्यासाठी रेल्वेस्टेशनकडे पायी निघाले होते.

दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वनविभागाच्या भिंतीलगत दोन तोतया पोलिस त्यांच्या जवळ आले व म्हणाले की, क्रांती चौकात खून झाल्याची थाप मारून त्यांची अंगझडती घेणे सुरू केले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे भुतडा घाबरले आणि त्याचाच फायदा आरोपींनी घेतला. रेल्वेस्टेशन, बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी बाहेरगावच्या प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

हातचलाखीने दागिने पळवले

भुतडा यांना बोलण्यात गुंतवून त्यांची अंगझडती घेतली. यावेळी हातचलाखीने गळ्यातील ४२ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि हातातील १२ आणि १४ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. घटना घडल्यानंतर आरोपी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून शिवाजी महाराज पुतळ्याच्या दिशेने पसार झाले. सुरुवातीला हा प्रकार भुतडा यांच्या लक्षातच आला नाही. मात्र आरोपी निघून गेल्यानंतर गळ्यातील चेन आणि हातातील अंगठ्या गायब असल्याचे दिसून आले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT