शहरवासीयांच्या सदृढ आरोग्यासाठी आयएमएचा पुढाकार Pudhari
छत्रपती संभाजीनगर

शहरवासीयांच्या सदृढ आरोग्यासाठी आयएमएचा पुढाकार

१ फेब्रुवारी रोजी हेल्दी सिटी मॅरेथॉनचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

IMA's initiative for the healthy development of city dwellers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

रुग्णसेवेसोबतच आयएमए कनेक्ट, आओ गाव चले यांसह विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनने आता शहरवासीयांच्या सदृढ आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. यासाठीच १ फेब्रुवारी रोजी शहरात हेल्दी सिटी मॅरेथॉन-२०२६चे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर यांनी शनिवारी (दि. २४) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सचिव डॉ. योगेश लक्कस, कोषाध्यक्ष डॉ. शिवाजी पोळ, सदस्य तथा मॅरेथॉनचे आयकॉन डॉ. प्रफुल्ल जटाळे उपस्थित होते. समर्थनगर येथील आयएमए हॉल येथून १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता मॅरेथॉनला सुरुवात होईल. क्रांती चौक, आकाशवाणी चौक ते सिडको चौक आणि परत याच मार्गे आयएमए हॉल असा मार्ग आहे. सर्व वयोगटांतील नागरिक तसेच कुटुंबांसाठी मॅरेथॉनमध्ये २ कि.मी. व ३ कि.मी., फॅमिली फन रन, तसेच टायमर चिप सुविधेसह ५ किमी व १० किमी रनचा समावेश आहे.

फिटनेसचा प्रसार, कौटुंबिक सहभाग, सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणे आणि निरोगी शहर ही संकल्पना पुढे नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, शहरातील आयएमएतर्फे आयोजित करण्यात येणारी ही पहिलीच आणि वैशिष्ट्यपूर्ण हेल्दी सिटी मॅरेथॉन ठरणार आहे.

आपल्या आरोग्यासाठी घ्या धाव...

या मॅरेथॉनमध्ये सहभागींना आयएमएच्या वतीने टी-शर्ट, टायमर चिप देण्यात येणार असून, २० पेक्षा अधिक व्यक्तींच्या समूहासाठी विशेष सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विलंब न करता लवकरात लवकर नोंदणी करावी आणि आपले आरोग्य उत्तम रहावे, यासाठी रोज एक धाव... याची सुरुवात १ फेब्रुवारीपासून करावी, असे आवाहन अध्यक्ष डॉ. टाकळकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT