Illegal constructions demolished What about parking?
अमित मोरे :
छत्रपती संभाजीनगर : शहरात ३ लाख २५ हजारांच्या ब्रदर्स जवळपास मालमत्ता आहेत. यात सुमारे १३ टक्के म्हणजेच ४३ हजार मालमत्ता व्यावसायिक आहेत. त्यातील सुमारे ५ टक्के मुख्य बाजारपेठेत असून, येथील एकाही दुकानाकडे स्वतःच्या मालिकच्या पार्किंग नाही. प्रत्येकाने पार्किंगच्या जागाही गिळंकृत करीत त्याठिकाणी अंडरग्राऊंड गोडाऊन, दुकाने थाटली आहेत.
संपूर्ण शहरात व्यावसायिक मालमत्त ाधारकांनी हाच फार्म्युला वापरला आहे. तेव्हा शहरातील बेकायदा बांधकामानंतर आता या गिळंकृत पार्किंगच्या जागा महानगरपालिका मोकळ्या करणार आहे का, असा सवाल शहरवासीयांनातून उपस्थित होत आहे.
शहरातील जवळपास सर्वच व्यावसायिक बांधकामधारकांनी मोठ्याप्रमाणात पार्किंगच्या जागा गिळंकृत केल्या आहेत. यात केवळ दुकानदारच नव्हे तर दोन ते तीन मजल्याच्या व्यापारी संकुलातील पार्किंगच्या जागाही या मालमत्ताधारकांनी गिळंकृत केल्या आहेत. जालना रोड आणि सिडको हडको भागातील हॉटेल व्यवसायिकांनीही अशाच प्रकार पार्किंगच्या जागांमध्ये व्यवसाय थाट्न स्वतः हजारो, लाखो रुपयांचे उत्पन्न कमवित आहेत अन् ग्राहकांना त्यांची वाहने सपशेल महापालिकेच्या रस्त्यावर उभ्या करण्यास भाग पाडत आहेत. यात दंडात्मक कारवाईला वाहनधारकांनाच सामोरे जावे लागत आहे. एवढेच नव्हे रस्त्यावर उभ्या रा हणाऱ्या या वाहनांमुळेच सतत वाहतूक कोंडी निर्माण होते. मात्र प्रशासन चोर सोडून सन्यासालाच फाशी देत आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य बाजारपेठेत मोडणाऱ्या औरंगपुरा, गुलमंडी, रंगारगल्ली, दिवाणदेवडी, सराफा, भांडीबाजार, सिटी चौक, अंगुरीबाग, शहागंज, गांधीपुतळा, पैठणगेट, कुंभारवाडा, मच्छली खडक या परिसरात लहानमोठी सुमारे एक हजार दुकाने आहेत. यातील एकाही व्यापाऱ्यांनी अथवा मालमत्ताधारकांनी आपापल्या दुकानांच्या इमारतींमध्ये स्वतःच्या पार्किंग उपलब्ध केल्या नाहीत.
दुकान - १७४००
आस्थापना-१४००
मोठी दुकाने-१२६००
हॉटेल्स-९५००
दवाखाने-१२००
रुग्णालये-९००
मॉल्स-६
एकूण - ४३०००
२०१० साली खंडपीठाने शहरातील गिळंकृत केलेल्या पार्किंगबाबत जनहित याचिका दाखल झाली होती. त्यात खंडपीठात ५४ व्यावसायिक इमारतींची यादी सादर केली होती. या सर्व पार्किंगच्या जागा मोकळ्या करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. परंतु त्यानंतरही अद्याप मुख्य बाजारपेठेतील गिळंकृत केलेल्या जागा मोकळ्या केलेल्या नाहीत.
प्रत्यक्षात १०० चौरस मीटरचे बांधकाम केल्यास त्यासाठी दोन पार्किंग लॉड्स (२.५ चौ.मी. ते ५ चौ. मी.) टाकणे आवश्यक असते. त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाचे बांधकाम असेल तर त्यासाठी तेवढ्याच क्षमतेचे मोठी जागा पार्किंगसाठी राखीव ठेवणे यूडीसीपीअ-ारच्या नियमावलीनुसार आवश्यक आहे.
शहरातील एकूण मालमत्तांपैकी २५ टक्के मालमत्ता या व्यावसायिक आहेत. त्यातील एकट्या निराला बाजार, औरंगपुरा, गुलमंडी, पैठणगेट नव्हे तर त्यासोबतच सिडको हडको, चिकलठाणा, शिवाजीनगर, जालना रोड यासह संपूर्ण शहरातील रस्त्यांवर असलेल्या व्यावसायिक बांधकाम परवानग्यांची कागदपत्रे आणि प्लॅन तपासताच कोणी किती पार्किंगच्या जागा गिळंकृत केल्या हे प्रशासनाला उघड होईल.