Sambhajinagar News : पप्पांना सांगून तुला मारायला लावतो : 10 वर्षांच्या चिमुकल्याला धमकावले File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : पप्पांना सांगून तुला मारायला लावतो : 10 वर्षांच्या चिमुकल्याला धमकावले

उकळली दीड लाखाची खंडणी : तू टुकार वागतोस, अशा सततच्या धमक्यांनी कोवळ्या मनावर बिंबवली दहशत

पुढारी वृत्तसेवा

"I'll tell Dad to beat you up": 10-year-old child threatened.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा वडिलांची सतत भीती दाखवून एका १० वर्षांच्या चिमुकल्याला मानसिकदृष्ट्या वेठीस धरून शेजारी राहणाऱ्या तरुणाने खंडणी उकळल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तू टुकार वागतोस, व्यसन करतोस आणि मोकाट तुला त्यांच्याकडून बेदम मारायला लावतो, अशी भयंकर दहशत बालकाच्या मनात निर्माण केली. मारहाणीच्या भीतीपोटी चिमुकल्याने घरातील कपाटातून वेळोवेळी आरोपीला तब्बल १ लाख ६० हजार रुपये काढून दिले. हा धक्कादायक प्रकार ६ ते २५ मे दरम्यान सत्कर्मनगर, बीड बायपास, सातारा परिसरात घडला.

उद्धव बिलवने फिरतोस... हे सर्व तुझ्या पप्पांना सांगून उद्धव कुंडलिक बिलवने (२०, रा. सत्कर्मनगर) असे आरोपीचे नाव असून, सातारा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा परिसरातील बीड बायपास भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील तक्रारदार महिला खासगी ज्वेलर्स दुकानात नोकरी करतात, तर त्यांचे पती ट्रक चालक आहेत. त्यांनी आपल्या गावाकडील शेती विकून आलेली रक्कम घरातील कपाटात सुरक्षित ठेवली होती. २७ मे रोजी दुपारी कपाट उघडून पाहिले असता, ठेवलेल्या पैशांपैकी १ लाख ६० हजार रुपये गायब असल्याचे पतीच्या निदर्शनास आले.

त्यांनी याबद्दल पत्नीकडे चौकशी केली, मात्र त्यांनाही याविषयी काहीच माहिती नव्हती. त्यानंतर त्यांनी आपल्या १० वर्षांच्या मुलाला विश्वासात घेऊन विचार पूस केली, तेव्हा या धक्कादायक आणि संतापजनक प्रकाराचा उलगडा झाला. त्यांच्या ओळखीचा शेजारी रा-हणारा आरोपी उद्धव बिलवने याने ६ मे ते २५ मे या कालावधीत या चिमुकल्याला गाठून वारंवार धमकावले होते.

मुलाने रडत रडत सर्व हकीकत सांगितल्यानंतर पालकांनी तातडीने सातारा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घाबरलेल्या चिमुकल्याने कपाटातून काढून दिले पैसे

आरोपी बिलवने या मुलाला सतत धमकावत होता. वडिलांच्या कल्पनेनेच प्रचंड भेदरलेल्या या चिमुकल्याने घरात कोणी नसताना कपाटातून वेळोवेळी प्रत्येकी १० हजार रुपये काढून खिडकीतून आरोपीच्या हवाली केले. एका लहानग्याला वेठीस धरून आरोपीने अवघ्या १५ दिवसांत तब्बल १ लाख ६० हजार रुपये उकळले. इतकेच नव्हे, तर नंतर त्याने जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचे तक्रारीत उघडकीस आले आहे.

मैत्रिणीसोबत मौजमजेत उडवले पैसे

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी हा भेळचा गाडा चालवतो आणि केटरिंगचे काम करतो. एका निष्पाप मुलाला दहशतीखाली ठेवून उकळलेल्या या पैशांतून त्याने स्वतःची गाडी दुरुस्त करून घेतली. त्यानंतर तो त्याच्या मैत्रिणीसोबत वॉटर डॅमवर फिरायला गेला. अवघ्या १५ दिवसांत त्याने मुलाकडून उकळलेले सर्व पैसे मौजमजेत उडवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

पाचशेच्या नोटेने आरोपी अडकवला

आरोपी बिलवने याला सातारा पोलिसांनी अटक केली, तेव्हा त्याच्याकडून ५०० रुपयांची एक नोट जप्त करण्यात आली. पोलिसांनी शहानिशा केली असता, ही नोट मुलाच्या घरातील उर्वरित पैशांच्या बंडलमधील नोटांच्या अनुक्रमांकाशी तंतोतंत जुळली. या भक्कम तांत्रिक पुराव्यामुळे त्यानेच खंडणी उकळल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास उपनिरीक्षक पांडुरंग कोकणे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT