If you waive the loans of industrialists, then why not those of farmers: Bachchu Kadu
करमाड, पुढारी वृत्तसेवा : हजारो कोटी रुपयांची उद्योगपतींची कर्जे सरकारकडून माफ केली जातात, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैशाचे सोंग पुढे सरकार करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात शेतकरी सुखी होता, मात्र आताच्या सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे, अशी घाणाघाती टीका शेतकरी नेते प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकावर केली.
तालुक्यातील फेरण जळगाव येथे कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी, मच्छीमार, दिव्यांग, शेतमजूर, निर-ाधार, शेतकरी कर्जमाफी सभेचे आयोजन जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यावेळी बच्चू कडू बोलत होते.
शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा वाली कोणी नसल्याने इतर वस्तूंचे एकीकडे भाव गगणाला भिडले आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाच्या मालाला भाव दिला जात नाही. त्यांचे सोयाबीन असो, कापूस असो मातीमोल किमतीत खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू मांडताना कोणीच दिसत नाही. त्यामुळे हा शेतकऱ्यांचा लढा असून, हा कोणत्या धर्माचा वा जातीचा लढा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जात धर्म बाजूला ठेवून सर्वांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची हीच वेळ असल्याचे ते म्हणाले.
या सभेला जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार, कामगार, शेतमजूर, ग्रामपंचायत कर्मचारी, दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर शिंदे यांनी केले होते.
तुम्हाला जाती आणि धर्माच्या नावाखाली सरकार गुंतून ठेवून उद्य-ोगपतींचे घर भरण्याचे काम हे सरकार करत आहे. त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने २८ ऑक्टोबरला नागपूर या ठिकाणी मोर्चाला सर्वांनी मोठ्या संख्येत यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.