Chhatrapati Sambhajinagar murder case
कन्नडमध्ये पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला File Photo
छत्रपती संभाजीनगर

छ.संभाजीनगर : कन्नडमध्ये पत्नीचा गळा आवळून खून

Chhatrapati Sambhajinagar murder : पाठलाग करून पतीला अटक; शहर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : शहरात पत्नीचा मध्यरात्री ओढणीने गळा आवळून खून करून पतीने स्वतः चहा करून केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता दाराला कुलूप लावून पसार झाला. ही घटना गुरूवारी (दि.२४) मध्यरात्री इंदीरा नगर परिसरात घडली. रेश्मा लाईक अन्सारी (वय ३८) असे मृत पत्नीचे नाव असून याप्रकरणी पती लाईक जावेद अन्सारी (वय ३८ वर्षे) याला पाठलाग करून पोलिसांनी अटक केली.

शहरातील इंदीरा नगर परिसरात लाईक अन्सारी हा आपल्या पत्नी रेश्माबरोबर भाड्याच्या खोलीत राहत होता. सहा महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्यानंतर सतत दोघांत वाद होत होता. गुरूवारी (दि.२४) त्याचा वाद टोकाला गेल्याने रात्री अन्सरी याने आपल्या पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने स्वत : चहा करून पत्नीच्या मृतदेहासमोर बसून चहा घेतला. त्यानंतर मध्यरात्री अडीचच्या दरम्यान घराला कुलूप लावून निघून गेला.

त्यानंतर त्याने आपल्या पत्नीचा आपण खून केला असल्याची माहिती फोनवरून आपल्या बहीण- भावाला दिली. त्यांनी घरी जावून पाहिले असता त्यांना त्याच्या घराला कूलूप दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांनी याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता घरात रेश्मा मृत अवस्थेत आढळून आली. त्यांनतर पोलिसांना लाईक अन्सारी याचे नातेवाईक मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कन्नड पोलिसांचे पथकाकडून त्याचा शोध सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी चाळीसगावच्या दिशेने जात असलेल्या पिकअप वाहनाचा पाठलाग करून लाईक अन्सरी याला ताब्यात घेतले. रेश्मा अन्सरी यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून लाईक अन्सरी याच्यावर शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीने पत्नीचा खून करून मृतदेहासमोर बसून चहा घेतला

पत्नीचा खून करून लाईक अन्सारी याने आपल्या चहा केला. व आपल्या पत्नीच्या मृतदेहासमोर बसून तो चहा घेतला. त्यानंतर काही वेळानंतर त्याने घराला कुलूप लावून तो तेथून पसार झाला. पोलिसांनी ५ किलोमीटर पाठलाग करून त्याला चाळीसगावजवळून ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.