Huge crowd of devotees on the first Saturday of Shravan at bhadra maruti
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावण शनिवारी भाविकांनी गर्दी केली होती. जय भद्राचा जयघोष करत हजारो भाविकांनी घेतले भद्रा मारुतीचे दर्शन घेतले.
पहिल्या श्रावण शनिवारी केळी व बेलपत्रांनी भद्रा मारुतीची मूर्तीची आकर्षक असा सजावट करण्यात आली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी भद्रा मारुतीचा जयघोष केल्याने खुलताबादनगरी शनिवारी दुमदुमली. यावर्षीपासून प्रशासनाच्या वतीने स्पेशल दर्शन, व्हीआयपी दर्शन, मंदिर गाभाऱ्यात अभिषेक बंद केल्याने भाविकांचे दर्शन लवकर होताना दिसून आले.
श्रावण महिन्याचा पहिला शनिवार असल्याने मोठ्या संख्येने भाविक शहरात दाखल झाले होते. दर्शनासाठी शुक्रवारी रात्रीपासूनच चारही बाजूंनी हजारो भाविक पायी चालत खुलताबादकडे येत होते. रात्री बारा वाजेनंतर भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे जय भद्राचा जयघोष करीत खुलताबादनगरीत दाखल होत होते. पायी येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी चहापाणी, फराळाची व्यवस्था विविध सेवाभावी संस्था, संघटनांतर्फे करण्यात आली होती. श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा लागल्या होत्या ती रात्री उशिरापर्यंत दिसून आली.
श्रावण महिन्याचा पहिला शनिवार असल्याने दर्शनासाठी भाविकांची अफाट गर्दी दिसून आली. शहरातील सर्व मुख्य रस्त्यावर गाड्यांच्या रांगचा रांगा दिसून आल्या. श्रावणच्या सुरुवातीलाच पावसाने चागल्या प्रमाणात हजेरी लावण्याने शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे. यामुळे मंदिर परिसरातील हार, पानफुल, नारळा, पेडा, खेळण्यांची चांगली विक्री झाली. भाविकांना पावसाचा त्रास होऊ नये, म्हणून भव्य टिन शेड दीडशे बाय दोनशे उभारणी करण्यात आली आहे, दर्शन रांगा लावण्यासाठी महिलांना व पुरूषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे लावून संपूर्ण परिसर हा सीसीटीव्हीच्या नजरेत ठेवलेला आहे होता. संस्थानतर्फे खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते, संस्थानतर्फे भक्तांच्या आरोग्य सेवेसाठी दवाखाना २४ तास सुरू होता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.