School Uniform : २६० रुपयांत दर्जेदार गणवेश कसा शक्य? (Pudhari File Photo)
छत्रपती संभाजीनगर

School Uniform : २६० रुपयांत दर्जेदार गणवेश कसा शक्य?

शासनाच्या निर्णयामुळे शाळा व्यवस्थापन समितीवर आर्थिक ताण

पुढारी वृत्तसेवा

How is it possible to get a quality uniform for Rs. 260?

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असताना शासनाने विद्यार्थ्यांच्या मोफत शालेय गणवेशासाठी दिल्या जाणाऱ्या निधीत कपात केल्याने मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यापूर्वी प्रति विद्यार्थी गणवेशासाठी ३०० रुपये निधी उपलब्ध करून दिला जात होता. तीनशे रुपयांमध्ये दर्जेदार गणवेश मिळू शकत नाही म्हणून एका गणवेशासाठी ५०० रुपये शासनाने द्यावी अशी मागणी होत असताना अचानक २६० रुपये शालेय व्यवस्थापन समितीला एक गणवेशासाठी देणार असून त्या तोही शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश विद्यार्थ्यांना द्यायचा असा निर्णय झाला आहे-

२६० रुपयांमध्ये दर्जेदार गणवेश देणे कसे शक्य आहे. गेल्या काही वर्षांत कापड, दोरा, बटणे, शिवणकाम तसेच वाहतूक खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. महागाईमुळे पूर्वी ३०० रुपयांतही गणवेशाची व्यवस्था करणे कठीण जात असताना आता २६० रुपयांत विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा गणवेश देणे जवळपास अशक्य असल्याची भावना शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.

कापड, शिवणकाम आणि इतर साहित्याच्या किमती सातत्याने वाढत असताना गणवेशासाठीचा निधी ३०० रुपयांवरून ५००, ही मागणी असताना, शासन स्तरावरून सध्या २६० रुपये देणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश विद्यार्थ्यांना द्यायचे हे कसे शक्य आहे हे वास्तवाशी विसंगत आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शाळा आणि गरीब विद्यार्थ्यांना बसणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश मिळावा ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हा निर्णय मागे घेऊन निधी वाढवावा. अन्यथा शाळा व्यवस्थापन समित्या आणि पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडेल.
अशोक भावले, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT