School Uniform : शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याची आशा धूसर

सिल्लोड : गणवेश निधी रखडला, शिक्षक परिषदेचा नाराजीचा सूर
School Uniform
School UniformPudhari
Published on
Updated on

School Uniform: Hopes of receiving uniforms on the first day of school appear dim.

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : नवीन शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून सुरुवात होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश, शूज, पाठ्यपुस्तके दिली जातात. यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक आगळावेगळा आंनद दिसून येतो. तर नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्याला अवघे १५ दिवस राहिलेले असताना देखील गणवेश निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. यामुळे शिक्षक परिषदेसह जिल्ह्यातील मुख्यध्यापकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

School Uniform
Palghar ZP decision: पालघरात नववी-दहावीचे वर्ग सुरूच राहणार

दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, शूज, पाठयपुस्तके दिली जातात. यासाठी शासनाकडून मुख्यध्यापकांच्या खात्यावर निधी जमा केला जातो. यानंतर मुख्यध्यापक, शालेय समिती सदस्य गणवेश, शूज खरेदी करतात. मात्र नवीन शैक्षणिक वर्ष १५ दिवसांवर आलेला असताना देखील अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. यामुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) विभागाच्या वतीने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निवेदन देऊन निधी त्वरीत वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे.

एकीकडे मुख्याध्यापकांना पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, शूज व पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या जातात. तर दुसरीकडे त्यासाठी आवश्यक असलेला निधीच वेळेत दिला जात नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तातडीने निधी वर्ग करावा अशी मागणी संघटनेचे प्रांत सहकार्यवाह नितीन पवार, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष शशिकांत सावंत, जिल्हाध्यक्ष देविदास सांगळे, जिल्हा कार्यवाह साईनाथ भालेराव, जिल्हा संघटन मंत्री राहुल पवार, जिल्हा कोषाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, जिल्हा सहसंघटन मंत्री समाधान गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता हावळे यांनी केली आहे.

School Uniform
Sharad Pawar: जागतिक विद्यापीठांशी ‌‘रयत‌’चा समन्वय
प्रशासनाकडून निधी लवकर प्राप्त झाला. तर वेळेत गणवेश, शुज खरेदी करुन पहिल्या दिवशीच गणवेश वाटप करता येईल. शिवाय मिळणारा निधी हा आजच्या महागाईच्या दरानुसार फार कमी पडतो. त्यामुळे निधी वाढवून देण्यात यावा. जेणेकरुन गणवेश, शूज चांगल्या प्रतीचे खरेदी करता येईल.
- देविदास सांगळे जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news