शॉर्टसर्किटमुळे हळदा येथे घराला आग; घरासह किराणा दुकान जळून खाक file photo
छत्रपती संभाजीनगर

Short Circuit Fire : शॉर्टसर्किटमुळे हळदा येथे घराला आग; घरासह किराणा दुकान जळून खाक

वाहन खरेदीसाठी जमवलेले सात लाख रुपये आगीत भस्मसात; दहा लाखांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

House catches fire in Halda due to a short circuit; house and grocery shop completely gutted

उंडणगाव, पुढारी वृत्तसेवा : हाळदा येथील बसस्थानक परिसरात रविवारी (दि. २२) सकाळी साडेआठच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे घराला भीषण आग लागली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य आणि किराणा दुकानातील माल जळून खाक झाला. या दुर्घटनेत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे, नवीन वाहन खरेदीसाठी पिकाची विक्री करून जमवून ठेवलेली सात लाख रुपयांची रोख रक्कमही आगीत जळून गेल्याने संजय दुनिया सिंग शिमरे यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

हाळदा येथील बसस्थानक परिसरात शिमरे यांच्या घरातील विद्युत वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुरुवातीला वायरिंगमधून ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.

घरातील संसारोपयोगी वस्तू, फर्निचर, कपडे आणि इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीची झळ शेजारील किराणा दुकानालाही बसली. दुकानातील माल, डीप फ्रीझर आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले.

दरम्यान, शेतातील पिकाची विक्री करून नवीन वाहन खरेदीसाठी शिमरे कुटुंबाने सात लाख रुपये जमा केले होते. ही रक्कम घरात ठेवलेली असताना आगीत जळून भस्मसात झाली. घरातील साहित्य, किराणा दुकानातील माल आणि रोख रक्कम असे मिळून जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे शिमरे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

रोख रक्कम जळाली

दरम्यान, शेतातील पिकाची विक्री करून नवीन वाहन खरेदीसाठी शिमरे कुटुंबाने सात लाख रुपये जमा केले होते. ही रक्कम घरात ठेवलेली असताना आगीत जळून भस्मसात झाली. घरातील साहित्य, किराणा दुकानातील माल आणि रोख रक्कम असे मिळून जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT