Railway News : रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्यात चक्क हनिमूनची सजावट file photo
छत्रपती संभाजीनगर

Railway News : रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्यात चक्क हनिमूनची सजावट

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून सुहागरात एक्सप्रेसच्या प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

Honeymoon-style decoration in a railway First AC coach

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना नवनवे अनुभव येतात. असाच काहीसा मजेशीर अनुभव म्हणजे एका नवविवाहित जोडप्यासाठी रेल्वेच्या फर्स्ट एसी कूप डब्याचे थेट हनिमून सूटमध्ये रूपांतर केल्याचा आला. डब्यात रंगीबेरंगी फुगे, फुले, मखमली पडदे आणि बर्थवर चक्क गुलाबाच्या पाकळ्या पसरवून 'आय लव्ह यू' चा संदेश... अशा आकर्षक सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ आल्यानंतर नेटकऱ्यांनी सुहागरात एक्सप्रेस आणि 'हनिमून ऑन व्हील्स' अशा गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या.

हा व्हायरल व्हिडिओ नंदीग्राम एक्सप्रेसमधील असून, या रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने आपला फर्स्ट एसी कूप डबा सजवण्यासाठी ऑनलाईन एका डेकोरेटरला खासगीरीत्या नियुक्त केले होते. सोमवारी जालना स्टेशनवर खासगी डेकोरेटरने डब्यात अनधिकृत प्रवेश करून डब्यात हनिमून सूट सारखी सजावट केली होती. या जोडप्याने छत्रपती संभाजीनगरहून जालनापर्यंत गाडीने आणि पुढे या रेल्वे प्रवास केला.

याच सजावटीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी सजावटीचे कौतुक करताना, रेल्वेच्या डब्यात अशा प्रकारची खासगी सजावट करण्यास परवानगी आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला. काहींनी सुरक्षा, स्वच्छता आणि रेल्वे नियमांच्या अनुषंगाने चिंता व्यक्त केली. दरम्यान, हा प्रकार समोर येताच रेल्वे प्रशासनाने तडकाफडकी कर्मचाऱ्याचे निलंबन प्रकरणाच्या करून चौकशीचे आदेश दिले आहेत.

कर्मचारी निलंबित, रेल्वे विभागीय चौकशी करणार

जालना स्टेशनवर डेकोरेटरचा डब्यात प्रवेश अनधिकृत होता. ही एक गंभीर चूक आहे. संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, सविस्तर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीच्या निष्कर्षांनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

खासगी डेकोरेटरकडून सजावट

६ जुलै रोजी ट्रेन क्रमांक ११०२ नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने आपला फर्स्ट एसी कूप डबा सजवण्यासाठी ऑनलाईन एका डेकोरेटरला खासगीरीत्या नियुक्त केले होते. त्या डेकोरेटरने डब्याची सजावट केली. दरम्यान डेकोरेटरविरुद्ध जालन्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT