हिट अँड रन : सुसाट बसच्या धडकेत निवृत्त पशुवैद्यक ठार  File Photo
छत्रपती संभाजीनगर

हिट अँड रन : सुसाट बसच्या धडकेत निवृत्त पशुवैद्यक ठार

सिडको पोलिस ठाण्याजवळील जिगिषा शाळेसमोरील घटना

पुढारी वृत्तसेवा

Hit and Run: Retired Veterinarian killed in collision with bus

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कंपनी कामगारांची ने-आण करणाऱ्या सुसाट बसने दुचाकीस्वार वृद्धाला उडविल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात बुधवारी (दि.१०) दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास पाठक सिडको पोलिस ठाण्याजवळील जिगिषा शाळेसमोर घडला. डॉ. दिवाकर प्रभाकर पाठक (७७, रा. एन-७, सिडको) असे मृताचे नाव असून, पाठक हे खडकेश्वर येथील पशुवैद्यकीय विभागातून पशुवैद्यक म्हणून निवृत्त झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पाठक हे बुधवारी त्यांच्या नातेवाइकांकडे पितृपक्षाचा कार्यक्रम असल्याने जेवण करण्यासाठी गेले होते. दुचाकीने ते घराकडे परत निघाले होते. जिगिषा शाळेजवळ येताच त्यांना कंपनीच्या सुसाट बसचालकाने (एमएच-२० जीसी-५८५४) जोराची धडक दिली. धडक एवढी भीषण होती की डॉ. पाठक हे दुचाकीवरून उडून रस्त्यावर फेकल्या गेले. त्यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला.

धडक दिल्यानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, जामदार भीमराव शेवगे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी डॉ. पाठक यांना नागरिकांच्या मदतीने जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह घाटीत शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास जमादार भीमराव शेवगे करत आहेत.

धडकी भरवणाऱ्या वेगात धावतात बस

कंपनीच्या कामगारांची ने-आण करणारी बस होती, असे पोलिसांनी सांगितले. मात्र तो घटनास्थळावरून पळून गेल्याने शोध घेतला जात आहे. दरम्यान, शहरात धडकी भरवणाऱ्या वेगात या बस धावत असून, यावर कोणाचेही नियंत्रण नाही. यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT